Besharam Rang ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:01 AM2023-01-12T10:01:02+5:302023-01-12T10:01:55+5:30

पठाणच्या गाण्यांना कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झालाय. जितका वाद वाढतोय तितकीच गाण्यांची लोकप्रियता वाढतेय.

besharam-rang-song-tops-the-list-of-most-favourite-songs-jhoome-jo-pathaan-at-no-3 | Besharam Rang ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ !

Besharam Rang ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ !

googlenewsNext

Pathaan Movie :  गेल्या काही दिवसांतील सर्वात वादग्रस्त तसेच चर्चेतला विषय म्हणजे शाहरुखच्या पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद चांगलाच पेटला. इतकंच नाही तर हे गाणं चोरीचं असल्याचाही आरोप झाला. यानंतर बॉयकॉट पठाणही ट्रेंड होऊ लागले. पण एकंदर या वादाचा गाण्याला मात्र फायदाच झाला आहे. 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाले आणि गाण्याच्या व्हिडिओने 199 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. आता तर हे गाणे सर्वात आवडीच्या गाण्यांमध्ये नंबर १ ठरले आहे. 

ऑरमॅक्स हार्टबिट्स (Ormax Heartbeats) यांनी 'टॉप ५' गाण्यांची यादी जाहीर केली आहे. सर्वात लोकप्रिय, श्रोत्यांच्या सतत प्लेलिस्ट मध्ये असलेले गाणे कोणते तर ते बेशरम रंग आहे. पठाणचे हे गाणे लोकांना भलतेच आवडलेले दिसतेय. या यादीत 'ब्रम्हास्त्र'चे 'केसरिया' हे गाणं नंबर २ वर आहे. तर पठाणचंच 'झूमे जो पठाण' हे गाणं तिसऱ्या क्रमाकांवर आहे. म्हणजेच पठाणच्या गाण्यांना कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झालाय. जितका वाद वाढतोय तितका गाण्यांचा व्हिडिओ पाहिला जातोय. तसेच यामध्ये दीपिका फारच बोल्ड अवतारात दिसत आहे तर शाहरुखचा शर्टलेस अवतार बघून फॅन्स घायाळ झाले आहेत. सध्या पठाणची दोन्ही गाणी चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहेत.

Pathaan Movie Trailer : भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का? काही वेळात मिळाले २० लाख व्ह्यूज

एकीकडे पठाणची गाणी हिट झाली आहेत तर दुसरीकडे पठाणच्या ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. ट्रेलरला ३६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. २५ जानेवारी रोजी पठाण चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांचीही भूमिका आहे.

Web Title: besharam-rang-song-tops-the-list-of-most-favourite-songs-jhoome-jo-pathaan-at-no-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.