बॉलिवूडच्या या चित्रपटांमध्ये दाखवलंय बहीण-भावांचं प्रेम, रक्षाबंधननिमित्त हे चित्रपट नक्की बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 05:13 PM2023-08-30T17:13:53+5:302023-08-30T17:52:14+5:30

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे भाऊ-बहिणींच्या खास नात्यांवरच तयार करण्यात आले आहेत.

Best Brother And Sister relationship movies | बॉलिवूडच्या या चित्रपटांमध्ये दाखवलंय बहीण-भावांचं प्रेम, रक्षाबंधननिमित्त हे चित्रपट नक्की बघा

Best Brother And Sister relationship movies

googlenewsNext

देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह आहे. भाऊ-बहिणींमध्ये कितीही वाद झाले तरीही यांचे नाते अतिशय खास असते.  बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत. जे भाऊ-बहिणींच्या खास नात्यांवरच तयार करण्यात आले आहेत. हे चित्रपट नेमके कोणते आहेत, ते आज रक्षाबंधन सणानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरुन रक्षाबंधन हा सण आणखी खास करण्यासाठी तुम्ही आपल्या भाऊ-बहिणींसोबत हे चित्रपट पाहू शकता.


जोश 
अभिनेता शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जोश’ चित्रपट 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटात जुळे भाऊ-बहीण दाखवण्यात आले आहेत.  हा चित्रपट  सुपरहिट ठरला होता


 सरबजीत

सरबजीत हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. ज्यामध्ये सरबजीत नावाच्या व्यक्तीला पाकिस्तानकडुन गुप्तहेर समजून अटक केली जाते आणि त्याची बहीण दलबीर आपल्या भावाला भारतात परत आणण्यासाठी करताना दिसून येते. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी भाऊ-बहिणीचे अतूट नाते फार चांगले रंगवले आहे.


रक्षाबंधन

अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटात भाऊ आणि बहिणीचे अतूट नाते दाखवण्यात आले आहे. एक भाऊ आपल्या चार बहिणींच्या लग्नासाठी कसा संघर्ष करतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.


 'हम साथ साथ है'

सूरज बडजात्या यांचा 'हम साथ साथ है' हा चित्रपटही भाऊ-बहिणीचे अतूट नाते दाखवतो. ज्यामध्ये मोठा भाऊ आपल्या दोन लहान भावांना आणि बहिणींना कसे एकत्र ठेवतो, हे खूप छान दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात मोहनीश बहल, सैफ अली खान, सलमान खान आणि नीलम यांनी भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली आहे.

बंधन 

 बंधन हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. अश्विनी भावेने या चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात भाऊ आणि बहिण यांच्यामधील बाँडिंग दाखवण्यात आलं आहे.


बम बम बोले

हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते. तर कलाकारांमध्ये दर्शील सफारी, अतुल कुलकर्णी, रितुपर्णा सेनगुप्ता आणि जिया वस्तानी यांचा समावेश होता. एका भावाने आपल्या बहिणीचा बूट हरवल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले होते. घरची आर्थिक परिस्थिती अशी आहे की ते आई-वडिलांना हे सांगू शकत नाहीत. यानंतर भाऊ आपल्या बहिणीसाठी नवीन शूज मिळवण्यासाठी काय-काय प्रयत्न करतो, हे चित्रपटात पाहायला मिळते. हा खूप भावनिक प्रवास आहे.
 

Web Title: Best Brother And Sister relationship movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.