पडद्यावरचे ‘भगतसिंग’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 10:38 AM2016-09-29T10:38:41+5:302016-09-29T16:08:41+5:30

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारक शहीद भगतसिंग यांची २८ सप्टेंबर ही जयंती.  दिल्लीच्या विधिमंडळावर बॉम्ब फेकणे, बॉम्ब बनविणे, खूनी हल्ले ...

Bhagat Singh! | पडद्यावरचे ‘भगतसिंग’!

पडद्यावरचे ‘भगतसिंग’!

googlenewsNext

/>
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारक शहीद भगतसिंग यांची २८ सप्टेंबर ही जयंती.  दिल्लीच्या विधिमंडळावर बॉम्ब फेकणे, बॉम्ब बनविणे, खूनी हल्ले करणे, सरकार उलथून टाकण्याच्या विध्वंसक कारवाया करणे आदी गंभीर गुन्ह्यांखाली भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या तीन क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली. मात्र भारतमातेचे हे थोर सुपूत्र हसत हसत फासावर चढले. ‘भारतमातेसाठीचे इतिकर्तव्य संपले. आमच्या बलिदानाने शेकडो युवक पेटून उठले पाहिजेत. त्यांनी आमचे अपुरे क्रांतिकार्य वेगाने व नेटाने चालवावे. मी खुशीने फासावर लटकून जगाला दाखवून देईन की, क्रांतिकारक आपल्या आदर्शांसाठी केवढ्या धीरांने बलिदान देतात’,असे म्हणत हसत हसत भगतसिंग फासावर लटकले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आदी क्रांतिकारकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत अनेक चित्रपट व पुस्तकेही आलेले आहेत. विविध चित्रपटांमध्ये विविध अभिनेत्यांनी भगतसिंगांची भूमिका साकारली. त्याचाच एक आढावा, खास तुमच्यासाठी...

अजय देवगन :





‘द लेजेंड आॅफ भगत सिंग’ हा चित्रपटात भगतसिंगच्या जीवनावर आधारित असून, २००२ मध्ये तो प्रदर्शित झाला होता. अजय देवगनने यात  भगतसिंगची भूमिका साकारली होती. राजकुमारी संतोषी दिग्दर्शित या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर आधारित या चित्रपटात अजय बरोबरच सुशांत सिंह, अखिलेंद्र मिश्रा, राजबब्बर, अमृता राव, मुकेश तिवारी, सुरेंद्र राजन, स्वरुप कुमार, अरुण पटवर्धन व अबीर गोस्वामी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. बॉक्स आॅफिसवरही हा चित्रपट यशस्वी ठरला होता.

सोनू सूद





सुकूमार नायर दिग्दिर्शत ‘ शहीद-ए- आजम’ हा चित्रपट २००२ मध्ये  प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटात सोनू सूद याने भगतसिंगची भूमिका साकारली होती. हा चित्रपट काहीसा वादग्रस्तही ठरला होता. यामध्ये चंद्रशेखरच्या भूमिकेत राज झुत्शि तर राजगुरुच्या भूमिकेत देव गिल होते.

मनोज कुमार :





१९६५ मध्ये  ‘शहीद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंगची भूमिका साकारली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर आधारित हा आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणता येईल. यात निरुपा रॉय या भगतसिंगची पत्नी दुर्गा भाभीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. याशिवाय कामिनी कौशल, प्रेम चोप्रा, अनंत मराठे, प्राण आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. यातील देशभक्तीपर गीतांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.

सिद्धार्थ नारायण :






साऊथचा चॉकलेट बॉय सिद्धार्थ नारायण हा ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात भगतसिंगच्या भूमिकेत दिसला होता. यात अमिर खान चंद्रशेखर आझादच्या तर अतुल कुलकर्णी हा रामप्रसाद बिस्मीलच्या भूमिकेत दिसला होता.

बॉबी देओल :






सन २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘२३ मार्च १९३१ : शहीद’ या चित्रपटात बॉबी देओलने भगतसिंगची भूमिका साकारली होती.  यामध्ये सनी देओल, अमृता सिंग, राहुल देव, विकी आहुजा, सुरेश ओबेरॉय आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.



 

Web Title: Bhagat Singh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.