35 वर्षांनी पुन्हा रिलीज होणार सलमान खानचा चित्रपट, प्रेम-सुमनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:02 PM2024-08-20T15:02:10+5:302024-08-20T15:02:36+5:30

सलमान आणि भाग्यश्री प्रेक्षकांच्या आठवणी जागवत सिनेमागृहांमध्ये दाखल होणार आहे.

Bhagyashree and salman khan Maine Pyar Kiya Special Re-Release in theatres on August 23 | 35 वर्षांनी पुन्हा रिलीज होणार सलमान खानचा चित्रपट, प्रेम-सुमनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

35 वर्षांनी पुन्हा रिलीज होणार सलमान खानचा चित्रपट, प्रेम-सुमनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

Maine Pyar Kiya Re-Release :  ३५ वर्षांपुर्वी डिसेंबर १९८९ रोजी प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यातील (Salman Khan) आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा (Bhagyashree) या रोमॅटिक जोडीने सर्वांना जणू वेडच लावले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३५ वर्षे झाली तरीही अद्याप या जोडीची क्रेझ कमी झालेली नाही. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

सलमान आणि भाग्यश्री प्रेक्षकांच्या आठवणी जागवत सिनेमागृहांमध्ये दाखल होणार आहे. राजश्री फिल्मसने 'मैने प्यार किया' पुन्हा एकदा  23 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज करणार असल्याची माहिती दिली आहे. हा चित्रपट पीव्हीआर आणि सिनेपॉलिसमध्ये रिलीज होणार आहे.  या निमित्ताने त्या काळातील तरुणाईच्या मनातील आठवणींच्या अल्बमची पाने पुन्हा उलगडली जाणार आहेत.  तर सध्याच्या तरुणाईलाही एका गाजलेल्या संगीतप्रधान प्रेमकथेचा आनंद सिनेमागृहात लुटता येणार आहे. 


सूरज बडजात्याचा 'मैने प्यार किया' चित्रपटात सलमान खानने प्रेम नावाची भूमिका साकारली होती. तर भाग्यश्रीने सुमनची व्यक्तीरेखा साकारली होती.   चित्रपटाची कथाच नाही तर त्यातील गाणीही सुपरहिट झाली होती. या चित्रपटातून दोन्ही कलाकार एकाच रात्रीत सुपरस्टार झाले होते. या चित्रपटात सलमान आणि भाग्यश्रीची जोडी  प्रेक्षकांना खूप आवडली होती. या सिनेमामध्ये सलमान आणि भाग्यश्रीशिवाय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह रिमा लागू, मोहनीश बहल, राजीव वर्मा यांसारख्या कलाकारांनी काम केलं होतं. 


Web Title: Bhagyashree and salman khan Maine Pyar Kiya Special Re-Release in theatres on August 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.