मुलानंतर भाग्यश्रीच्या मुलीनेही बॉलिवूडमध्ये केली एन्ट्री, सायकॉलॉजिकल थ्रिलर कथेतून होणार डेब्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 19:01 IST2022-01-27T18:58:31+5:302022-01-27T19:01:32+5:30
Avantika Dassani : याआधी भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानीने २०१८ मध्ये 'मर्द को दर्द नहीं होता' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. आता अवंतिका ग्लॅमरच्या विश्वात आपला ठसा उमटवण्यासाठी सेट आहे.

मुलानंतर भाग्यश्रीच्या मुलीनेही बॉलिवूडमध्ये केली एन्ट्री, सायकॉलॉजिकल थ्रिलर कथेतून होणार डेब्यू
'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीची (Bhagyashree) मुलगी अवंतिका दसानी (Avantika Dassani) निर्माता रोहन सिप्पीच्या सायकॉलॉजिकल थ्रीलर ड्रामा सीरिज 'मिथ्या' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. या सीरिजच्या निर्मात्यांनी अवंतिकाला लॉन्च करण्याची घोषणा एका पोस्टरच्या माध्यमातून केली. याआधी भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानीने २०१८ मध्ये 'मर्द को दर्द नहीं होता' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. आता अवंतिका ग्लॅमरच्या विश्वात आपला ठसा उमटवण्यासाठी सेट आहे.
रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये अवंतिकाचा इंटेंस लूक दिसत आहे. दोन फीमेल लीड असलेल्या या ट्विस्टेड कथेसोबत अवंतिका दसानी आपल्या पहिल्या ऑनस्क्रीन एक्सपीरियन्समध्ये एक पॉवर-पॅक भूमिका करताना दिसत आहे. आपल्या पहिल्या प्रोजेक्टबाबत अवंतिका म्हणाली की, 'आपल्या पहिल्या प्रयत्नासाठी अशाप्रकारची आव्हानात्मक भूमिका आणि इंटरेस्टींग कथा निवडणं फारच रोमांचक होतं. अनुभवी आणि चांगल्या लोकांसोबत काम करायला मिळालं त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. माझ्यासारख्या न्यूकमरचं त्यांनी स्वागत केलं'.
पहिल्याच प्रोजेक्टसाठी ओटीटीची निवड करण्याबाबत अवंतिका म्हणाली की, 'आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक आपल्या सर्वात रोमांचक अनुभव आणि चांगल्या कथांच्या शोधात येतात. आणि मला माझा प्रवास यावरून सुरू करण्यात आणि या प्रवासाचा भाग होऊन खरंच आनंद होत आहे. मला आशा आहे की, मिथ्या लोकांना आवडेल'. ही सीरिज Zee5 वर रिलीज होणार आहे.