लहान मुलीसाठी देवदूत बनला भाईजान, बोन मॅरो डोनेट करत सलमानने वाचवले चिमुकलीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:49 PM2024-07-30T12:49:11+5:302024-07-30T12:49:31+5:30

Salman Khan : अभिनेता सलमान खान हा देशातील पहिला बोन मॅरो डोनर आहे. काही वर्षांपूर्वी त्याने एका चिमुरडीचा जीव वाचवला होता.

Bhaijaan became an angel for a little girl, Salman Khan saved the little girl's life by donating bone marrow | लहान मुलीसाठी देवदूत बनला भाईजान, बोन मॅरो डोनेट करत सलमानने वाचवले चिमुकलीचे प्राण

लहान मुलीसाठी देवदूत बनला भाईजान, बोन मॅरो डोनेट करत सलमानने वाचवले चिमुकलीचे प्राण

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे जो कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहतो. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खान लोकांना मदत करताना करतो. तसेच अनेक वर्षांपूर्वी त्याने बोन मॅरो दान करून एका लहान मुलीचे प्राण वाचवले होते. अशाप्रकारे सलमान खान भारतातील पहिला बोन मॅरो डोनर ठरला.

एका मुलीला ब्लड कॅन्सर झाला होता, तिच्या उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज होती. या मुलीच्या आईने सलमान खानला इतर लोकांकडून मदतीचे आवाहन केले पण कोणीही पुढे आले नाही. पण नंतर सलमान खान पुढे आला आणि वचन दिले. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने बोन मॅरो डोनरची नोंदणी करून घेतली आणि भारताचा पहिला बोन मॅरो डोनर बनून आपले वचन पूर्ण केले. 

सलमान ४ वर्षांच्या मुलीसाठी ठरला देवदुत
एमडीआरआयच्या बोर्ड सदस्यांपैकी एक असलेले डॉ. सुनील पारेख यांनी नंतर याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, पूजा नावाच्या ४ वर्षाच्या मुलीबद्दल कळल्यानंतर सलमानने तिच्या मदतीसाठी आपल्या फुटबॉल टीमला चॅरिटीसाठी नेले. अखेरच्या क्षणी संघाचा पराभव झाला तेव्हाही सलमान मागे हटला नाही आणि मुलीला मदत केली. या कामात त्याचा धाकटा भाऊ अरबाज खानही त्याच्यासोबत पुढे आला.


सलमानचा हा व्हिडीओ झाला होता व्हायरल
एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जेव्हा महिलेने तिच्या मुलीसाठी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रत्येकाकडे मदत मागितली, त्यानंतर सलमानने वचन दिले. या व्हिडिओमध्ये सलमान म्हणतोय की तो त्याची बोन मॅरो टेस्ट करून घेईल आणि जर तो जुळला तर त्याला पूर्ण मदत करेल. त्या मुलीला सलमान खानने वाचवले पण एवढेच नाही तर त्याने अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. सलमान खानने अनेकदा सांगितले आहे की त्याच्या 'बीइंग ह्युमन' स्टोअरमधील निम्म्याहून अधिक विक्रीतील रक्कम त्याच्या 'बीइंग ह्युमन' चॅरिटीला जाते.

अनेकांना भाईजानने केलीय मदत
याशिवाय सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक कलाकार आणि अभिनेत्रींनाही मदत केली आहे. ज्यामध्ये सोमी अली, फराज खान, राखी सावंत यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. हे सर्व सांगतात की जेव्हा त्याने सलमान खानकडे मदत मागितली तेव्हा स्टारने त्याला साथ दिली.

Web Title: Bhaijaan became an angel for a little girl, Salman Khan saved the little girl's life by donating bone marrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.