Bhaijaan: 'भाईजान'च्या शूटिंगसाठी लेह-लडाखला पोहोचला सलमान खान, फोटो दिसला स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 06:21 PM2022-08-19T18:21:27+5:302022-08-19T18:26:34+5:30

Salman Khan: 'टायगर 3' चित्रपट ट्रोल्सच्या निशाण्यावर आला होता. सलमान 'भाईजान' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

Bhaijaan Salman Khan shares new photo from shooting in Leh Ladakh | Bhaijaan: 'भाईजान'च्या शूटिंगसाठी लेह-लडाखला पोहोचला सलमान खान, फोटो दिसला स्वॅग

Bhaijaan: 'भाईजान'च्या शूटिंगसाठी लेह-लडाखला पोहोचला सलमान खान, फोटो दिसला स्वॅग

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेता सध्या त्याच्या 'टायगर 3' आणि 'भाईजान' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याचा 'टायगर 3' चित्रपट ट्रोल्सच्या निशाण्यावर आला होता. सलमान  'भाईजान' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सलमानच्या दोन्ही चित्रपटांच्या सेटवरून त्याचे फोटो अनेकदा लीक होतात. पण आज स्वतः सलमान खानने त्याच्या 'भाईजान' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा नवा लूक समोर आला आहे. सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये सलमान लेह लडाखमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये सलमान खानचा स्वॅगही दिसत आहे. लांब मोकळे केस, गॉगल आणि बॅक पोज देऊन सलमान सुपर स्टायलिश दिसतो.फोटोत त्याच्या जवळ एक क्रूझर बाईकही उभी असलेली दिसत आहे. फोटो शेअर करत सलमान खानने लिहिले, 'लेह लडाख.'

सलमान खानच्या चाहत्यांना त्याची स्टाईल खूप आवडली आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतो. काही चाहते त्याच्या लूकची खूप प्रशंसा करत आहेत, तर काहींना सलमानचा हा लूक एकदम स्टायलिश आणि वेगळा वाटतो. चाहत्यांसोबतच सेलेब्सही या पोस्टवर कमेंट करत आहेत.

रिपोर्टनुसार, सलमान खानचा हा चित्रपट 'वीरम' या तमिळ चित्रपटापासून प्रेरित आहे. दिग्दर्शक फरहाद सामजी यांनी 'वीरम'च्या कथेला ट्विस्ट करून 'भाईजान'ची कथा लिहिल्याचं बोललं जात आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Bhaijaan Salman Khan shares new photo from shooting in Leh Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.