'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने भांडी घासून केला मुलांचा सांभाळ; तीच अभिनेत्री आज ओढतीये खोऱ्याने पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:00 IST2023-04-25T17:59:57+5:302023-04-25T18:00:43+5:30
कॉलेजमध्ये असताना या अभिनेत्रला दिग्दर्शक सुदेश लहरी यांनी पाहिलं आणि हिला आपल्या शोमध्ये घ्यायचं असल्याचं तिच्या शिक्षकांना सांगितलं. मात्र, भारतीने हे काम करण्यास नकार दिला.

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने भांडी घासून केला मुलांचा सांभाळ; तीच अभिनेत्री आज ओढतीये खोऱ्याने पैसे
कलाविश्वात आज अनेक कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. झगमगत्या विश्वात वावरणाऱ्या या कलाकारांची लक्झरी लाइफ, आलिशान घरं, त्यांचा स्टारडम हा कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतो. मात्र, पैसा, यश, प्रसिद्धी मिळवणाऱ्या या कलाकारांपैकी अनेक जणांचा हा प्रवास सोपा नाही. बऱ्याच कलाकारांनी मोठा स्ट्रगल करुन हे स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच कलाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी आज जाणून घेऊ. या अभिनेत्रीच्या आईने एकेकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी करुन मुलांचा सांभाळ केला आहे.
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी प्रसिद्ध विनोदवीर, अभिनेत्री म्हणजे भारती सिंह (bharti singh) . प्रसिद्ध विनोदवीरांच्या यादीत भारतीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. परंतु, ही लोकप्रियता मिळवण्यापूर्वी भारतीने आणि तिच्या कुटुंबियांनी प्रचंड हालाखीचं जीवन जगलं आहे. एका मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केलं.
भारती दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. परिणामी, घरची सगळी जबाबदारी तिच्या आईवर आली. मुलांचा सांभाळ करण्यासाठी भारतीच्या आईने घरोघरी जाऊन धुणी भांडी करायचं काम सुरु केलं. भारतीदेखील अनेकदा तिच्या आईसोबत जायची आणि या लोकांची मोठी घर पाहून आपलं घर कधी होईल याची स्वप्न रंगवायची.
दरम्यान, कॉलेजमध्ये असताना भारतीला दिग्दर्शक सुदेश लहरी यांनी पाहिलं आणि हिला आपल्या शोमध्ये घ्यायचं असल्याचं तिच्या शिक्षकांना सांगितलं. मात्र, भारतीने हे काम करण्यास नकार दिला. त्यावर तू हा शो केला तर तुझी फी माफ होईल. सोबतच तुझं आणि तुझ्या कॉलेजचं नाव मोठं होईल असंही तिला सांगण्यात आलं. त्यानंतर भारतीने पहिल्यांदा कॉमेडी ड्रामा करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे भारती आज लोकप्रिय कॉमेडियन म्हणून ओळखली जाते. इतकंच नाही तर आज भारती एका शो साठी प्रचंड मोठं मानधन घेत असल्याचंही सांगण्यात येतं.