'देवा' सिनेमातील 'भसड़ मचा' गाणं रिलीज, शाहिद आणि पूजाचा दमदार डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:31 IST2025-01-11T15:31:01+5:302025-01-11T15:31:32+5:30

Deva Movie : शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांच्या 'देवा' या चित्रपटातील नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळालीय.

'Bhasad Macha' song from the movie 'Deva' released, Shahid and Pooja's powerful dance | 'देवा' सिनेमातील 'भसड़ मचा' गाणं रिलीज, शाहिद आणि पूजाचा दमदार डान्स

'देवा' सिनेमातील 'भसड़ मचा' गाणं रिलीज, शाहिद आणि पूजाचा दमदार डान्स

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा चित्रपट 'देवा'(Deva Movie) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या आगामी चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. आता निर्मात्यांनी देवामधील नवीन गाणे रिलीज केले आहे. ज्याला खूप पसंती मिळत आहे. 

झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्स पुन्हा प्रेक्षकांना चकित करण्यात यशस्वी झालेत. देवाचे धमाकेदार पोस्टर, चित्रपटाचा टीझर आणि ‘भसड़ मचा’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मिका सिंगचा दमदार आवाज, शाहीद कपूरचा जबरदस्त कॉप अवतार आणि पूजा हेगडेची दमदार एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाहीदचा स्वॅग आणि पूजाची ग्रेस आणि एनर्जीमुळे हे गाणे प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. यात पूजा आणि शाहीदची छान केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. 

देवा कधी रिलीज होणार?
रोशन एंड्रयूज दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित देवा हा एक इलेक्ट्रीफाइंग ॲक्शन थ्रिलर आहे, जो ३१ जानेवारी, २०२५ रोजी रिलीज होणार आहे. ‘भसड़ मचा’  हे गाणे प्रदर्शित होताच या चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा आणखी वाढल्या असून, आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: 'Bhasad Macha' song from the movie 'Deva' released, Shahid and Pooja's powerful dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.