'थामा'मध्ये आयुषमान-रश्मिका 'या' अभिनेत्याशी करणार दोन हात, याआधी 'स्त्री २'मध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:54 IST2025-03-31T13:53:03+5:302025-03-31T13:54:23+5:30

छावानंतर मॅडॉक फिल्मच्या आगामी हॉरर कॉमेडी सिनेमात हा अभिनेता खास भूमिकेत दिसणार आहे

bhediya actor varun dhawan will play the villain ayushman khurana and rashmika mandanna movie thama | 'थामा'मध्ये आयुषमान-रश्मिका 'या' अभिनेत्याशी करणार दोन हात, याआधी 'स्त्री २'मध्ये केलंय काम

'थामा'मध्ये आयुषमान-रश्मिका 'या' अभिनेत्याशी करणार दोन हात, याआधी 'स्त्री २'मध्ये केलंय काम

मॅडॉक फिल्मची निर्मिती असलेला 'छावा' (chhaava) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. छावा निमित्ताने मॅडॉक फिल्मने चांगलीच कमाई केली. छावानंतर मॅडॉक फिल्म पुन्हा आपल्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सकडे लक्ष देत आहे. मॅडॉकचा आगामी सिनेमा आहे 'थामा'. आयुषमान खुराना-रश्मिका मंदानाची (rashmika mandanna) प्रमुख भूमिका असलेला 'थामा' सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. अशातच 'थामा' सिनेमात रश्मिका-आयुषमानचा (ayushman khurana) मुकाबला बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत होणार आहे.

हा अभिनेता 'थामा'मध्ये खलनायक 

सध्या मीडिया रिपोर्टमध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे 'थामा' सिनेमात रश्मिका-आयुषमानचा मुकाबला वरुण धवनसोबत होणार आहे. वरुण धवन पुन्हा एकदा भेडियाच्या रुपात या सिनेमात दिसणार आहे. वॅम्पायर असलेल्या आयुषमान खुरानाचा वरुण धवनच्या भेडियाशी सामना होणार आहे. त्यामुळे 'स्त्री २'नंतर प्रेक्षकांना 'थामा'च्या निमित्ताने पुन्हा एकदा कलाकारांचा अनोखा संगम बघायला मिळेल, यात शंका नाही.  नुकतंच वरुण आणि आयुषमान यांनी एका आलिशान स्टूडियोत या सीनचं शूटिंग केल्याची चर्चा आहे.

'थामा' सिनेमा कधी रिलीज होणार

२०२४ मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. 'थामा' सिनेमा यावर्षी अर्थात २०२५ मध्ये 'थामा' रिलीज होणार आहे.  'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री २' नंतर 'थामा' सिनेमा या हॉरर युनिव्हर्सचा पुढील भाग असणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. आदित्यने याच युनिव्हर्समधील 'मुंज्या' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

Web Title: bhediya actor varun dhawan will play the villain ayushman khurana and rashmika mandanna movie thama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.