भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने म्हटले,‘अपना टाइम आयेगा’; व्हिडीओ व्हायरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 17:13 IST2019-01-22T17:13:08+5:302019-01-22T17:13:57+5:30
आता या चित्रपटातील पहिले रॅप साँग 'अपना टाईम आयेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने म्हटले,‘अपना टाइम आयेगा’; व्हिडीओ व्हायरल!
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट गली बॉय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील पहिले रॅप साँग 'अपना टाईम आयेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘अपना टाइम आयेगा’ या गाण्यावर अॅक्ट करत आहे. या व्हिडीओच्या शेवटी ती तिच्या चाहत्यांना पाहून डोळा मारते. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
‘गली बॉय’च्या ट्रेलरमध्ये मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची परिस्थिती कशाप्रकारे असते, याची कथा ट्रेलरमधून मांडली गेली आहे. यात रणवीरचा संघर्ष दाखवला असून परिस्थितीमुळे सहन करावे लागणारे धक्के आणि यातून रॅप साँगपर्यंतचा त्याचा प्रवास या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. भोजपुरी सिनेमाची पॉप्युलर अभिनेत्री राणी चॅटर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे, ज्यामध्ये ती 'गली ब्वॉय' मध्ये रणवीर सिंह चित्रित केले गेलेले रॅप 'अपना टाइम आएगा' यावर अॅक्ट करत आहे. २९ वर्षांच्या रानीने हा व्हिडीओ एक व्हिडीओ डबिंग अॅपद्वारे तयार केला आहे. राणी या व्हिडिओमध्ये केवळ रॅपवर अॅक्ट करत नाहीये तर गाण्याच्या शेवटी मस्तीच्या मूडमध्ये डोळाही मारताना दिसत आहे. राणी चॅटर्जीने २००४ मध्ये मनोज तिवारीच्या अपोजिट ‘ससुरा बड़ा पैसावाला’ने भोजपुरी सिनेमामध्ये डेब्यू केला होता.