जमुईतील सीमाच्या मदतीसाठी भोजपुरी स्टारही आला पुढे...,अशी केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:55 AM2022-05-30T11:55:23+5:302022-05-30T12:17:19+5:30

काही दिवसांपूर्वी तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. ज्यात एक लहान मुलगी एका पायाच्या सहाय्याने उड्या मारत मारत शाळेत जाताना दिसत होती.

Bhojpuri rakesh mishra gives financial support toseema who jumped one leg to school | जमुईतील सीमाच्या मदतीसाठी भोजपुरी स्टारही आला पुढे...,अशी केली मदत

जमुईतील सीमाच्या मदतीसाठी भोजपुरी स्टारही आला पुढे...,अशी केली मदत

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. ज्यात एक लहान मुलगी एका पायाच्या सहाय्याने उड्या मारत मारत शाळेत जाताना दिसली होती. या मुलीचं नावं सीमा कुमारी आहे जी बिहारीचा राहणारी आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात सीमाला दिला. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने सीमाच्या पायांवरील उपचारांचा खर्च करणार अशी चर्चा होती. पण, त्याआधी सीमाला प्रशासनाकडून मदत मिळाली आणि अवघ्या दोन दिवसांत तिच्यासाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आला. यानंतर आता भोजपुरी अभिनेता आणि गायक राकेश मिश्राेने(Rakesh Mishra)ही सीमाला आर्थिक मदत केली आहे. त्याने मदतीसाठी एक रक्कम दिली आहे, ज्याची माहिती स्वत: अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहून दिली आहे आणि चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

फेसबुकवर याबाबत माहिती देताना राकेश मिश्राने लिहिले की, 'नशिबावरही मात करत ती एक पायाने शाळेत जाते, तिला सलाम, ही मुलगी जी जमुई बिहारची रहिवासी आहे, तिचे नाव सीमा कुमारी आहे. मी एका कलाकार म्हणून नाही तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुला मनापासून मदत देत आहे.तुझी आयुष्यात खूप प्रगती होवो, मनीष कश्यप भाऊ तुमचे आभार, तुम्ही या मुलीची आवाज बनलात आणि हे सर्वांपर्यंत पोहोचवले. अभिनेत्याने सीमाचा कौटुंबिक फोटो शेअर केला आहे तसेच 11000 रुपये ट्रान्सफर केल्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. सोशल मीडियावर लोक या अभिनेत्याचे कौतुक करत आहेत.

लोक करतायेत कमेंट्स 
राकेश मिश्रा यांच्या या कार्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'या गरीब मुलीला पैसे देऊन मनोबल वाढवल्याबद्दल धन्यवाद भाऊ. दुसऱ्याने लिहिले, 'तुमची विचारसरणी खूप प्रशंसनीय आहे मिश्रा जी, अशा कलाकारांना आकार नसतो आणि ते देशाचे रतन असतात, ज्यांच्या हृदयात गरीब असहायांसाठी जागा आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
 

Web Title: Bhojpuri rakesh mishra gives financial support toseema who jumped one leg to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.