Bholaa Vs Dasara : अजय देवगणचा ‘भोला की नानीचा ‘दसरा’ कोण ठरलं वरचढ? चौथ्या दिवशी किती केली कमाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:24 PM2023-04-03T13:24:09+5:302023-04-03T13:25:43+5:30
Bholaa-Dasara Box Office Collection Day 4: गेल्या ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर दोन धमाकेदार सिनेमे रिलीज झालेत. एक म्हणजे अजय देवगणचा ‘भोला’ आणि दुसरा म्हणजे साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’...
Bholaa-Dasara Box Office Collection: गेल्या ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर दोन धमाकेदार सिनेमे रिलीज झालेत. एक म्हणजे अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ (Bholaa) आणि दुसरा म्हणजे, साऊथ सुपरस्टार नानीचा ‘दसरा’(Dasara). बॉलिवूड आणि साऊथचा सिनेमा एकाचदिवशी रिलीज झाला म्हटल्यावर तुलना तर होणार. बॉक्स ऑफिसवरचे आकडे बघता, नानीच्या ‘दसरा’ने अजयच्या ‘भोला’ला चांगलाच घाम फोडल्याचं चित्र आहे.
‘दृश्यम २ ‘च्या यशानंतर ‘भोला’बद्दल अजयचा मोठ्या अपेक्षा होत्या. पण ‘भोला’ रिलीज झाला आणि या सिनेमाला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. याऊलट नानीच्या ‘दसरा’ने धमाकेदार सुरूवात केली.
पहिल्याच दिवशी ‘भोला’वर भारी पडला ‘दसरा’
रामनवमीच्या मुहूर्तावर ‘भोला’ व ‘दसरा’ हे दोन्ही सिनेमे रिलीज झालेत. पहिल्या दिवशी ‘भोला’ने ११.२० कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशी कमाईत आणखी घट झाली आणि या सिनेमाने केवळ ७.४० कोटींचा गल्ला जमवला. ‘दसरा’बद्दल सांगायचं तर पहिल्या दिवशी ‘दसरा’ने २३.२ कोटींची जबरदस्त कमाई केली. दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने ‘भोला’पेक्षा जास्त ९.७५ कोटींचा बिझनेस केला.
चौथ्या दिवशी ‘भोला’ने इतके कमावले
पहिल्या व दुसऱ्या दिवशी ‘भोला’ची कमाई अपेक्षेइतकी नव्हती. मात्र शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत मोठी वाढ दिसून आली. तिसऱ्या दिवशी शनिवारी चित्रपटाने १२.१० कोटी तर चौथ्या दिवशी रविवारी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई केली. अशा रितीने या चित्रपटाने आतापर्यंत ४४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आज सोमवारी चित्रपट ५० कोटींचा आकडा गाठेल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.
‘दसरा’ने चौथ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला
पहिल्याच दिवशी २३ कोटी कमावणऱ्या दसराच्या बिझनेसमध्ये शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मोठी घट दिसली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ९.७५ कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी शनिवारी १२.०१ कोटी तर रविवारी १३ कोटींचा गल्ला जमवला. याचसोबत दसराचं आत्तापर्यंतचं कलेक्शन ५८.८ कोटींवर पोहोचलं आहे.