'भूलभूलैय्या 3' मध्ये मंजूलिकासोबतच आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री, चाहत्यांची 'धकधक' वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:13 IST2024-02-13T15:11:42+5:302024-02-13T15:13:08+5:30
Bhool Bhulaiyaa 3: या नवीन अपडेटमुळे आता चाहत्यांची धकधक वाढणार आहे.

'भूलभूलैय्या 3' मध्ये मंजूलिकासोबतच आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री, चाहत्यांची 'धकधक' वाढली
हॉरर हिंदी सिनेमा 'भूलभूलैय्या 3' (Bhool Bhulaiyaa) ची नुकतीच घोषणा झाली आहे. भूलभूलैय्या 2 मध्ये कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) धमाल आणली होती. तर पहिला भाग अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विद्या बालन (Vidya Balan) यांच्यामुळे गाजला होता. आता भूलभूलैय्या 3 मध्ये ओरिजनल मंजुलिकाची एन्ट्री झाली आहे. विद्या बालन तिसऱ्या भागात झळकणार आहे. शिवाय आणखी एका अभिनेत्रीचंही नाव समोर आलं आहे. या नवीन अपडेटमुळे आता चाहत्यांची धकधक वाढणार आहे.
2007 साली प्रदर्शित झालेला 'भूलभूलैय्या' सिनेमा सुपरहिट झाला होता. यानंतर 2022 साली सिनेमाचा सीक्वेल आला. यामध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन दिसले नाहीत मात्र कार्तिक आर्यन, किआरा अडवाणी आणि तब्बूची एन्ट्री झाली. दुसऱ्या भागात मंजूलिकाच नाही म्हणल्यावर चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र सिनेमा ठिकठाक गाजला. आता तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा आहे. अक्षय कुमारची याही भागात दिसणार नाहीए मात्र विद्या बालन मंजुलिका बनून परत येणार आहे. शिवाय आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आहे. हे नाव म्हणजे 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit).
'भूलभूलैय्या 3' मध्ये रुह बाबाचा सामना एक नाही तर दोन भूतांशी होणार आहे. ती दुसरी भूतनी म्हणजे माधुरी दीक्षित असू शकते. माधुरीच्या एन्ट्रीवर अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. फिल्मची कहाणी पश्चिम बंगाल बॅकड्रॉपवर आधारित असणार आहे. म्हणजेच फिल्ममध्ये पुन्हा एकदा बंगाली कुटुंब बघायला मिळणार आहे. अनेक सीन्स कोलकाता येथे शूट होणार आहेत. या दिवाळीला 'भूलभूलैय्या 3' रिलीज होण्याची शक्यता आहे.