Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटानं केली इतक्या कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 12:18 PM2022-05-21T12:18:14+5:302022-05-21T12:18:40+5:30
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया २' देशभरात ३२०० हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)चा 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना मोठे सरप्राईज मिळाले आहे. या चित्रपटाकडून लोकांना फार कमी अपेक्षा होत्या. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक खूश झाले आहेत. चित्रपटात कॉमेडी आणि हॉररचा उत्तम डोस आहे. यामुळेच चित्रपट आणि कार्तिक या दोघांचेही कौतुक करताना कोणी थकत नाही. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आकडेही समोर आले आहेत.
भूल भुलैया २ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाचे कलेक्शन १३.७५ ते १४.७५ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट दुहेरी अंकात कमाई करेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला होता. आता त्यांचे म्हणणेही खरे ठरले आहे. भूल भुलैया २ देशभरात ३२०० हून जास्त स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. याला चाहत्यांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसच्या मते, भूल भुलैया २ची सुरुवात मॉर्निंग शोमध्ये २० टक्क्यांनी झाली. नाईट शोपर्यंत पन्नास टक्के झाला होता. चित्रपटाची सरासरी व्याप्ती ३५% होती. भूल भुलैया २ने कमी किमतीच्या तिकीट दरात ही कमाई केली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांच्या मते, भूल भुलैया २ पाहण्यासाठी जास्त लोक राष्ट्रीय मल्टिप्लेक्स साखळीपर्यंत पोहोचत आहेत. सध्या कार्तिकच्या चित्रपटाची मागणी राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीपेक्षा जास्त आहे. पहिल्याच दिवशी, भूल भुलैया २ चित्रपटाने सुमारे ८.५० लाख रुपयांची तिकिटे विकली आहेत.
‘BhoolBhulaiyaa2’ has more footfalls in national multiplex chains today than ‘RRR’(Hindi) had on its 1st day! ‘RRR’(Hindi) netted approx. Rs.8.25crore in multiplexes of national chains but ‘BB2’ may do around Rs. 7.5 crore. Only 10% less on collections..at 25% lower ticket rates!
— Komal Nahta (@KomalNahta) May 20, 2022
भूल भुलैया २ ची कथा राजस्थानमधील एका कुटुंबाची आणि मंजुलिकाची आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनने ढोंगी बाबाची भूमिका साकारली आहे, जो भूतांशी बोलण्याचा दावा करतो. त्याच्यासोबत तब्बू, राजपाल यादव, कियारा अडवाणी आणि संजय मिश्रा या चित्रपटातील इतर कलाकारही आहेत. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाची टक्कर कंगना राणौतच्या धाकडसोबत आहे.