Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा एकदा घाबरवण्यासाठी येतेय 'भूल भुलैया'ची 'मंजुलिका, कार्तिक आर्यनची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 19:49 IST2024-02-12T19:48:43+5:302024-02-12T19:49:10+5:30
Bhool Bhulaiyaa 3: २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया २' च्या जबरदस्त यशानंतर, चित्रपट निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग 'भूल भुलैया ३'ची घोषणा केली होती. त्यानंतर या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा एकदा घाबरवण्यासाठी येतेय 'भूल भुलैया'ची 'मंजुलिका, कार्तिक आर्यनची घोषणा
२०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiyaa 2) च्या जबरदस्त यशानंतर, चित्रपट निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग 'भूल भुलैया ३'(Bhool Bhulaiyaa 3) ची घोषणा केली होती. त्यानंतर या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान, कार्तिक आर्यन(Kartik Aryan)ने त्याच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठी घोषणा केली आहे. नुकताच कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्या बालनच्या 'भूल भुलैया' आणि कार्तिकच्या 'भूल भुलैया २' मधील 'आमी जे तोमार' गाण्याचे मिश्रित व्हर्जन दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिक आर्यनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आणि हे घडत आहे. आणि मंजुलिका भुलभुलैयाच्या दुनियेत परत येत आहे. विद्या बालनचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ही दिवाळी धमाकेदार असणार आहे.
चाहत्यांची उत्सुकता वाढली
त्याचबरोबर कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या या पोस्टला खूप पसंती दिली जात आहे. पोस्टवर कमेंट करून ते चित्रपटाबद्दलची उत्सुकताही व्यक्त करत आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत घोषणेमध्ये एवढेच सांगितले आहे की हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो.
'भूल भुलैया २'ने केली जबरदस्त कमाई
कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' चित्रपटाबद्दल सांगायचं तर, या सिनेमात कार्तिक व्यतिरिक्त, कियारा अडवाणी आणि तब्बू सारखे कलाकार होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१६.५ कोटींची कमाई केली होती. कार्तिक 'भूल भुलैया ३' व्यतिरिक्त 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार आहे.