माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:15 IST2024-10-09T15:15:16+5:302024-10-09T15:15:56+5:30
माधुरी दीक्षितने 'मंजुलिका' बनत दिलं सरप्राईज

माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
अनिस बझ्मी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी सिनेमा 'भूल भुलैय्या 3' (Bhool Bhulaiyaa 3) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सिनेमा रुह बाबाच्या भूमिकेत पुन्हा बघायला मिळतोय. तर त्याची जोडी तृप्ती डिमरीसोबत (Tripti Dimri) जमली आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. तर विद्या बालन (Vidya Balan) ओरिजनल मंजुलिका बनून आली आहे. मात्र माधुरी दीक्षितनेही (Madhuri Dixit) 'मंजुलिका' बनूनच भूल भुलैय्याच्या फ्रँचायझीमध्ये एन्ट्री केली आहे.
'भूल भुलैय्या 3' च्या तीन मिनिट ५० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तुफान कॉमेडी, कार्तिक आर्यनचा चार्मिंग अंदाज आणि विद्या-माधुरी दीक्षितची जोडी पाहून प्रेक्षक आतुर झाले आहेत. विद्या बालन मंजुलिका बनून परत आली असली तरी माधुरीनेही 'आमी मंजुलिका' म्हणत सर्वांना सरप्राईज केलं आहे. भूतिया हवेलीचा दरवाजा पुन्हा उघडला आहे. राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा यांचे कॉमेडी सीन्स प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. 'भूल भूलैय्या 3' तुफान मनोरंजन करणारा सिनेमा असणार हे नक्की.
दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी भिडणार आहे. २००७ साली 'भूल भुलैय्या'चा पहिला भाग आला होता. तर २०२२ साली याचा सीक्वेल आला होता. पहिल्या भागात अक्षय कुमारने सर्वांचं मन जिंकलं होतं. तर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यननेही कमाल केली होती. आता तिसऱ्या भागात विद्या बालनने कमबॅक केलं आहे तर माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे.