"मेरे ढोलना...", 'भूल भुलैय्या'मधील गाण्यावर मराठी अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स, माधुरी-विद्या बालनही पडतील फिक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 04:02 PM2024-12-01T16:02:26+5:302024-12-01T16:03:05+5:30
'मेरे ढोलना' गाण्यावर माधुरी दीक्षित आणि विद्या बालनची जुगलबंदी सिनेमात पाहायला मिळाली. आता या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनी डान्स केला आहे.
कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला 'भूल भुलैय्या २' सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. दिवाळीच्या मुहुर्तावर चाहत्यांना खास सरप्राइज देत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला. सिनेमाआधीच त्यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमातील 'मेरे ढोलना' गाण्यावर माधुरी दीक्षित आणि विद्या बालनची जुगलबंदी सिनेमात पाहायला मिळाली. आता या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनी डान्स केला आहे.
अभिनेत्री सोनाली खरे आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी 'मेरे ढोलना' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनाली आणि फुलवा 'मेरे ढोलना' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. सोनाली आणि फुलवा या माधुरी दीक्षित आणि विद्या बालनवरही भारी पडल्या आहेत.
दरम्यान, 'भूल भुलैय्या ३'मध्ये कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन, तृप्ती डिमरी हे कलाकार आहेत. १ नोव्हेंबरला 'भूल भुलैय्या ३' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत २५६ कोटींचा गल्ला जमवला आहे.