'भूलभूलैय्या 3' च्या सेटवरुन मंजुलिकासोबत माधुरीचाही फोटो लीक! लाल साडीत दिसली तृप्ती डिमरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:55 IST2024-05-29T14:54:43+5:302024-05-29T14:55:51+5:30
'भूलभूलैय्या 3'च्या सेटवरुन मुख्य कलाकारांचे फोटो लीक झाले आहेत. तृप्ती-विद्या-माधुरीचा ग्लॅमरस अंदाज भूरळ पाडणारा आहे. (bhool bhulaiyya 3, madhuri dixit, kartik aryan, vidya balan)

'भूलभूलैय्या 3' च्या सेटवरुन मंजुलिकासोबत माधुरीचाही फोटो लीक! लाल साडीत दिसली तृप्ती डिमरी
'भूलभूलैय्या 3' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. 'भूलभूलैय्या' यशस्वी पहिल्या दोन भागानंतर 'भूलभूलैय्या 3'ची प्रचंड चर्चा आहे. 'भूलभूलैय्या 3'मध्ये कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. आता 'भूलभूलैय्या 3'मध्ये कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, माधुरी दिक्षीत, विद्या बालन या तीन अभिनेत्री झळकणार आहेत. नुकतंच 'भूलभूलैय्या 3'च्या सेटवरुन फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये तिनही अभिनेत्रींचा अनोखा अवतार बघायला मिळतोय.
'भूल भूलैय्या 3' च्या सेटवरुन फोटो लीक
झूम एंटरटेनमेंटने 'भूलभूलैय्या 3'च्या सेटवरील लीक फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये काळ्या साडीत माधुरी आणि विद्या दिसत आहेत. दोघींचाही ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. याशिवाय तृप्ती लाल रंगाच्या साडीत बंगाली लूकमध्ये पाहायला मिळाली. याशिवाय कार्तिक आर्यन रुह बाबाच्या भूमिकेत पुन्हा त्याचा जुना अवतार रिक्रिएट करताना दिसतोय. या सर्व कलाकारांचे सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत.
'भूल भूलैय्या 3' विषयी..
अनीस बाझमी दिग्दर्शित 'भूलभूलैय्या 3' सिनेमा हा गाजलेल्या फ्रँजायझीचा तिसरा भाग असणार आहे. या तिसऱ्या भागात विद्या बालन जी पहिल्या भागात दिसली होती ती पुन्हा दिसणार आहे. याशिवाय माधुरी-विद्याच्या डान्सची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. कार्तिक आर्यनचा हा बिग बजेट महत्वाकांक्षी सिनेमा आहे, असं म्हटलं जातंय. हा सिनेमा दिवाळीत ऑक्टोबर २०२४ मध्ये भेटीला येणार आहे.