बहुचर्चित 'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री, २५ वर्षांनी अक्षय कुमारसोबत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:27 IST2024-12-20T11:26:59+5:302024-12-20T11:27:37+5:30

अक्षय कुमारच्या आगामी 'भूत बंगला' सिनेमाची उत्सुकता शिगेला असून अक्षय कुमारसोबत ही अभिनेत्री काम करणार आहे

Bhoot Bangla movie Akshay Kumar work with tabu after 25 years of hera pheri movie | बहुचर्चित 'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री, २५ वर्षांनी अक्षय कुमारसोबत करणार काम

बहुचर्चित 'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री, २५ वर्षांनी अक्षय कुमारसोबत करणार काम

'भूत बंगला' सिनेमाची काहीच दिवसांपूर्वी घोषणा झाली. 'भूल भूलैय्या' सिनेमानंतर अक्षय कुमार - प्रियदर्शन यांची जोडी अनेक वर्षांनी एकत्र काम करणार आहे. 'भूत बंगला' सिनेमाचं मोशन पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं. तेव्हापासूनच 'भूत बंगला' सिनेमाची खूप चर्चा आहे. अक्षय कुमार 'भूत बंगला' निमित्त अनेक वर्षांनी हॉरर कॉमेडी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत हिरोईन म्हणून कोण झळकणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याचा उलगडा झालाय.

'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री

अक्षय कुमारसोबत 'भूत बंगला' सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात होतं. पण याचा उलगडा नुकताच झालाय. अक्षय कुमारसोबत 'भूत बंगला'मध्ये अभिनेत्री तब्बू झळकणार आहे. २००० साली आलेल्या 'हेरा फेरी'नंतर अक्षय कुमारसोबत तब्बू झळकणार आहे. तब्बल २५ वर्षांनंतर अक्षय आणि तब्बू एकत्र काम करणार आहेत. प्रियदर्शनच्या या सिनेमानिमित्ताने 'भूत बंगला'मध्ये अक्षय-तब्बूला एकत्र पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.


'भूत बंगला' कधी रिलीज होणार?

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'भूत बंगला'ची रिलीज डेट काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलीय. 'भूत बंगला' पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही महिने वाट बघावी लागणार आहे. 'भूत बंगला' सिनेमा २ एप्रिल २०२६ ला रिलीज होणार आहे. म्हणजेच 'भूत बंगला' पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 'भूत बंगला'चं नवं पोस्टर शेअर करुन अक्षयने ही आनंदाची बातमी सर्वांना दिलीय. लवकरच 'भूत बंगला'च्या शूटिंगला सुरुवात होईल.

 

Web Title: Bhoot Bangla movie Akshay Kumar work with tabu after 25 years of hera pheri movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.