सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 09:00 PM2019-02-22T21:00:00+5:302019-02-22T21:00:00+5:30
अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया'मध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
असिस्टंट कास्टिंग डिरेक्टर या नात्याने भूमीने, आज बॉलिवूडमध्ये ए-लिस्टर्स असणाऱ्या कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या. त्यामध्येच एक होता अतिशय प्रतिभावान असा सुशांत सिंग राजपूत ज्याची ऑडिशन भूमीने घेतली होती. त्यावर सुशांतने त्याच्या दुसऱ्या चित्रपटामध्ये कास्ट करण्यासाठी भूमी पेडणेकरचे आभार मानले.
'द कपिल शर्मा' शो हा टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे आणि त्याचे चाहते दर वीकएन्डला आवडत्या कॉमेडियनच्या थेट प्रक्षेपणाची आतुरतेने वाट बघत असतात. येणाऱ्या भागांत सुशांत सिंग राजपूत, भूमी पेडणेकर, रणवीर शौरी, मनोज वाजपेयी आणि आशुतोष राणा हे 'सोन चिरैया' चित्रपटाचे कलाकार सहभागी होणार आहेत.
अनेक जणांना माहित नसेल की अभिनेत्री बनण्याअगोदर भूमी पेडणेकर असिस्टंट कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करत असे आणि यश राज फिल्म्समध्ये प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मांबरोबर काम करत असे. ती सांगते, "१२-१३ वर्षांची असल्यापासून मी ठरवले होते की मला अभिनेत्री व्हायचे आहे. पण नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी मी अगोदर आधी कास्टिंग डिरेक्टर बनायचे ठरवले. असिस्टंट कास्टिंग डिरेक्टर म्हणून मी यश राज फिल्म्समध्ये सहा वर्षं काम केले आणि त्यातून मला बरेच काही शिकायला मिळाले."
अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया'मध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले.