भूमी पेडणेकरने केले 'ह्या' सिनेमाचे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 18:07 IST2019-01-14T18:04:02+5:302019-01-14T18:07:58+5:30
अभिनेत्री भूमी पेडणेकर लवकरच 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' चित्रपटात झळकणार आहे.

भूमी पेडणेकरने केले 'ह्या' सिनेमाचे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर दिली माहिती
'दम लगा के हैशा', 'टॉयलेट एक प्रेमकथा' व 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटातील आपल्या भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर लवकरच 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण तिने पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्या निमित्त भूमीने ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटात ती 'किट्टी' या मुलीचे पात्र साकारत आहे.
भूमीने हे फोटो शेअर करून ट्विटरवर लिहिले की, 'किट्टी हे एक असे पात्र आहे, जी खूप बिनधास्त आहे. प्रेम आणि महत्वाकांक्षा बाळगणारी एक अल्लड मुलीची भूमिका या चित्रपटात साकारली. हे पात्र साकारताना फार मजा आली. हे पात्र नेहमी माझ्या लक्षात राहिल. चित्रीकरणाचा प्रवास अविस्मरणीय होता, यासाठी सर्वांचे आभार.'
अलंकृता श्रीवास्तव यांनी 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा डॉली व किट्टी या दोन महिलांवर आधारीत असून त्या ग्रेटर नोएडामध्ये सेटल आहेत. भूमी शिवाय यात कोंकणा सेन शर्मा देखील मुख्य भूमिका साकारत आहे. कोंकणा यात डॉलीच्या भूमिकेत दिसणार आहे. कोंकणा सेन व भूमी पेडणेकर या दोघीदेखील या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.