भूमी पेडणेकरने सोबत नेला ‘टॉयलेट एक प्रेमकथा’चा ‘लोटा’ अन् बरेच काही...!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:34 PM2019-02-13T15:34:35+5:302019-02-13T15:36:12+5:30
भूमीची एक सवय तुम्हाला माहितीय? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. होय, आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवरची खास वस्तू भूमी आपल्यासोबत घरी नेते आणि ती प्राणपणाने जपते.
ठळक मुद्देसोन चिरैया’ हा चित्रपट चंबळच्या खोºयातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे. इश्किया , डेड इश्किया आणि उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत.
उण्यापु-या चार वर्षांत भूमी पेडणेकरने बॉलिवूडमध्ये बराच मोठा पल्ला गाठला. चित्रपट निवडण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असलेल्या भूमीने गत चार वर्षांत एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. याच भूमीची एक सवय तुम्हाला माहितीय? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. होय, आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवरची खास वस्तू भूमी आपल्यासोबत घरी नेते आणि ती प्राणपणाने जपते.
अनेक स्टार्र्र्स शूटींग शेड्यूल संपताच सेटवरची एखादी वस्तू आठवण म्हणून सोबत नेतात. फिल्म इंडस्ट्रीत याला ‘शुभ’ मानले जाते. बहुसंख्य स्टार्स पार्टिंग गिफ्टच्या नावावर शूटींगवेळी वापरलेला सर्वात चांगला कॉस्च्युम आपल्यासोबत नेणे पसंत करतात. पण भूमीची बातचं न्यारी. तिने काय काय न्यावे, तर बरेच काही. ताज्या मुलाखतीत तिने याची यादीच दिली.
लवकरच भूमीचा ‘सोन चिरैया’ हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाच्या सेटवरून भूमीने एक साडी घरी आणली. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’च्या सेटवरचा ‘लोटा’ आठवण म्हणून तिने घरी आणला. तर ‘दम लगा के हईशा’च्या सेटवरून गुलाबी रंगाचा नाईट सूट, ‘लस्ट स्टोरी’च्या सेटवरची काही ज्वेलरी आणि ‘शुभ मंगल’च्या सेटवरचे काही कपडे तिने आठवण म्हणून घरी आणले. केवळ इतकेच नाही तर या सर्व चित्रपटांचा एक क्लॅपबोर्डही तिने आठवण म्हणून घरी आणला. हे सगळे क्लॅपबोर्ड भूमीच्या खोलीत सजवून ठेवण्यात आले आहेत. सकाळी उठल्या उठल्या भूमीची पहिली नजर या क्लॅपबोर्डवर जाते आणि भूमीचा प्रत्येक दिवस खास होतो. आहे ना खास...!
‘सोन चिरैया’ हा चित्रपट चंबळच्या खोºयातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे. इश्किया , डेड इश्किया आणि उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.