एकेकाळी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं वजन होतं ९० किलो, तरीदेखील रहायची बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 18:30 IST2019-11-18T18:30:00+5:302019-11-18T18:30:00+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं आता वजन घटविले असून आता ती खूपच ग्लॅमरस दिसते.

एकेकाळी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं वजन होतं ९० किलो, तरीदेखील रहायची बोल्ड
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा आगामी चित्रपट पति पत्नी और वो ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. भूमी अभिनयाव्यतिरिक्त स्टाईल स्टेटमेंटमुळेदेखील चर्चेत येत असते. नुकताच तिने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिच्या फॅशन व स्टाईल स्टेटमेंटबद्दल सांगितलं.
भूमी म्हणाली की, मी साईज किंवा रंगामुळे कधीच स्वतःला कमी लेखलं नाही. मी स्वतःला नेहमीच सेक्सी समजलं आहे. ज्यावेळी माझं वजन ९० किलो वजन होते त्यावेळी देखील स्वतःला आकर्षक समजत होते. त्यावेळी देखील मी छोटे कपडे परिधान करत होते आणि क्लीवेज दाखवतानादेखील अनकंम्फर्टेबल समजत नव्हते.
आऊटफिटच्या बाबतीत दुसऱ्या अभिनेत्रीसोबत तुलना केली जाते, त्याबद्दल भूमीनं आपलं मत मांडलं. तिने सांगितलं की, त्यात काही वाईट नाही. जर मी जे काही परिधान केले आहे ते दुसऱ्या कोणावर जास्त चांगलं वाटत असेल तर त्यात काय वाईट आहे.
भूमी पेडणेकरचा नुकताच बाला चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
आता चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.