भूमीच्या सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:00+5:30
भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर नुकतेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सेक्सी व बोल्ड दिसते आहे.

भूमीच्या सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे फोटो
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत चर्चेत असते. पण सध्या तिचा एक फोटो चर्चेत आला आहे. होय, सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चांगली चर्चा होताना दिसतेय. भूमीने साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर ग्रीन रंगाच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे.
तसेच तिने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील कूल फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोत तिने ब्लॅक रंगाच्या आऊटफिटवर ब्लॅक गॉगल लावलेला पहायला मिळतो आहे.
काही दिवसांपूर्वी भूमीने ऑरेंज रंगाच्या साडीतील देखील फोटो शेअर केले होते. साडीतदेखील ती खूप सेक्सी दिसत होती.
भूमी पेडणेकरचा नुकताच ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत होती. शूटर दादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन महिलांची भूमिका त्या दोघींनी साकारल्या होत्या.
वयाच्या साठीत शूटींगची सुरुवात करणाऱ्या या शूटर दादींनी अनेक मेडल जिंकले आहेत. या चित्रपटाची समीक्षकांनी खूप प्रशंसा मिळाली. तसेच या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
आता भूमी पेडणेकर पति पत्नी और वो या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.
याशिवाय भूमी डॉली किटी और वो चमकते सितारे या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री कोंकणा सेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.