पर्यावरण रक्षणासाठी भूमी पेडणेकरने स्वतःहून घेतला पुढाकार, करणार महत्त्वाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 06:24 PM2021-04-02T18:24:38+5:302021-04-02T18:26:47+5:30

आपला देश जैवविविधतेने तसेच पक्षी प्रजातींनी समृद्ध आहे. पक्ष्यांच्या बचावाकरिता भूमीने 19 वर्षीय हवामान वीर, अमन शर्मा समवेत टीम तयार केली आहे.

Bhumi Pednekar took the initiative to protect the environment and will do important work | पर्यावरण रक्षणासाठी भूमी पेडणेकरने स्वतःहून घेतला पुढाकार, करणार महत्त्वाचे काम

पर्यावरण रक्षणासाठी भूमी पेडणेकरने स्वतःहून घेतला पुढाकार, करणार महत्त्वाचे काम

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर कायमच पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करताना दिसते. भूमीने ऑनलाईन तसेच ऑफलाईन उपक्रम क्लायमेट वॉरियरची सुरुवात केली आहे. या मार्फत ती भारतातील नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी सजग करण्याचे काम करत आहे. आपला देश जैवविविधतेने तसेच पक्षी प्रजातींनी समृद्ध आहे. पक्ष्यांच्या बचावाकरिता भूमीने 19 वर्षीय हवामान वीर, अमन शर्मा समवेत टीम तयार केली आहे.

 
भूमी सांगते, “अमन हा भारतातील सर्वात तरुण वयाचा हवामान वीर आहे आणि मी त्याच्या कामाचा मागोवा घेत असते. त्याने हवामान बदलात मोठा फरक घडवून आणला आहे. त्याने ऑल इन फॉर क्लायमेट अॅक्शन या उपक्रमाची सुरुवात केली. तसेच कॅन – कक्कू अबाऊट नेचर क्लब या  क्लबची स्थापना केली. मानव आणि निसर्गाच्या दरम्यान असलेली नाळ तुटल्याचे त्याचे मत आहे आणि हे नाते अधिक चांगले कसे करता येईल हाच त्याचा  प्रयत्न आहे.”

हॉलीवूड सुपरस्टार लिओनार्डो डीकॅप्रिओ याने हवामान संवर्धनाविषयी मुद्दा समोर आणला होता.  अमानचे फोटो शेअर केले होते. यानंतर अमानने change.org समवेत ऑल इन फॉर क्लायमेट अॅक्शन’ची स्थापना केली. या उपक्रमात तो सह-संस्थापकाच्या भूमिकेत होता. त्याच्या नेटवर्कमध्ये जगभरातील 110 कार्यकर्ते असून 70 हून अधिक देशांत क्लायमेट इमर्जन्सी डिक्लरेशन पिटीशनची सुरुवात केली. जगातील नेतृत्व आणि संयुक्त राष्ट्रे जागतिक पातळीवर क्लायमेट इमर्जन्सी डिक्लरेशनची विचारणा करत आहेत.

 अमन हा आंतरराष्ट्रीय एनजीओ रि-अर्थ’चा सह-संस्थापक आहे, या एनजीओमध्ये 40 देशांमधील 300 हून अधिक स्वयंसेवकांचा समावेश आहे. या एनजीओ’ने युनिसेफ, अमनेस्टी इंटरनॅशनल, शॉन मेंडीस आणि जेडन स्मिथसोबत हातमिळवणी केली आहे.अमन याने जगभरातील 800 हून अधिक पक्षी पाहिले आणि त्यांची त्यांचे फोटोही कॅमे-यात कैद केले आहेत. 

एप्रिल 2018 दरम्यान तो कॅन (कक्कू अबाऊट नेचर) क्लबचा सह-संस्थापक झाला. हा नेचर क्लब सहभागीदारांच्या बाहेरच्या मोकळ्या वातावरणात, प्रयोगशील शिक्षणावर भर देतो. पक्षी निरीक्षण, वन्यजीव-संकल्पना आधारीत प्रश्नमंजुषा, समुदाय कला प्रकल्प, शोध आणि निसर्ग कार्यशाळा यांच्या मार्फत निसर्ग तसेच भारतातील शहरी पट्ट्यातील बालकांमधील परस्पर नाते दृढ करण्याचा त्याचा मानस आहे. कॅन हा लहान बालकांसाठीचा भारतातील पहिला आणि सर्वात मोठा युवक-प्रणीत निसर्ग आणि पक्षी निरीक्षण क्लब आहे. 

Web Title: Bhumi Pednekar took the initiative to protect the environment and will do important work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.