शाळेतून काढलं, डोक्यावर होतं लाखोंचं कर्ज, फोटोत दिसणारी ही चिमुकली आज आहे बॉलिवूडची स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 08:00 IST2023-10-06T08:00:00+5:302023-10-06T08:00:01+5:30
फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

शाळेतून काढलं, डोक्यावर होतं लाखोंचं कर्ज, फोटोत दिसणारी ही चिमुकली आज आहे बॉलिवूडची स्टार
अनेक कलाकार मंडळी स्वतःच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करताना पाहायला मिळतात. लहानपणीचे ते गोड आणि निरागस फोटो पाहून आपल्याला स्वतःचेच कौतुक वाटत असते. एवढेच नाही तर आपले जुने फोटो पाहून आपल्याला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते. परत एकदा बालपण अनुभवायला मिळाले असते तर किती बरे झाले असते असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. सोशल मीडियाच्या अशाच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ही चिमुरडीने बॉलिवूडमध्ये कोणाताही गॉडफादर नसताना स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
जर तुम्ही अद्याप या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल, तर आम्ही हिंट देतो, या अभिनेत्रीने व्यक्तिरेखेनुसार तिची फिगर आणि बॉडी लूक देखील बदलला आहे. तुम्हाला अजून अंदाज येत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ती एक गोंडस मुलगी आहे, आजची ग्लॅमर गर्ल भूमी पेडणेकर.
इथपर्यंत पोहोचण्यासाठी भूमीला बऱ्याच संघर्ष करावा लागला. एक वेळ अशी आली की, तिला आपलं शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वडिलांच्या निधनानंतर या मुलीवर लहान वयातच घरची जबाबदारी येऊन पडली. पैशांसाठी तिनं सिनेमा जगतात प्रवेश केला. भूमीच्या वडिलांनी तिच्या अभ्यासासाठी 13 लाखांचे कर्ज घेतले होते.
वयाच्या १५ व्या वर्षी भूमीने आपले प्राथमिक शिक्षण आर्य विद्या मंदिरातून पूर्ण केले. यानंतर त्यांनी अभिनय शिकण्यासाठी व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये प्रवेश घेतला, भूमीची उपस्थिती खूपच कमी होती त्यामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं. वडिलांनी काढलेले कर्ज फेडण्यासाठी तिने यशराज बॅनरमध्ये कास्टिंग असिस्टंट म्हणून काम केले. दरम्यान, त्याने अनेक ऑडिशन्सही दिल्या. तिने दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.