दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 19:23 IST2024-05-15T19:22:42+5:302024-05-15T19:23:37+5:30
दिव्याने सोशल मीडियावरुन कुमार हे आडनाव हटवलं होतं.

दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
टीसीरिजचे संचालक भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि त्यांची पत्नी दिव्या खोसला (Divya Khosla) यांच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दिव्याने सोशल मीडियावरुन कुमार हे आडनाव हटवलं होतं. नंतर यात काही तथ्य नसल्याचं त्यांच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं. आता या चर्चांवर भूषण कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
भूषण कुमार यांचा 'श्रीकांत' सिनेमा नुकताच रिलीज झाला. राजकुमार रावने यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. यावेळी प्रमोशनदरम्यान भूषण कुमार यांना घटस्फोटावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले,"इथे आपण श्रीकांत सिनेमाबद्दल बोलत आहोत." पुढे ते म्हणाले, 'मात्र असं काही नाहीए. आम्ही याआधीच स्पष्टीकरण दिलं आहे. ज्योतिषांच्या सांगण्यावरुन तिने नावात बदल केला होता. मी हे मानत नाही पण तिचा यावर विश्वास आहे."
भूषण कुमार आणि दिव्या खोसला १३ जानेवारी २००५ साली लग्नबंधनात अडकले. त्यांनी वैष्णोदेवी मंदिरात लग्न केले होते. 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. तेव्हाच दोघं प्रेमात पडले. दिव्याने टीसीरिजच्या निर्मितीखाली अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.