‘बाबूमोशाय बंदूकबाज’ची अभिनेत्री बिदिता बाग हिने चित्रांगदा सिंहबद्दल दिले असे काही बयान!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 04:49 AM2017-07-25T04:49:15+5:302017-07-25T10:19:15+5:30
‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येतो आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यात मुख्य भूमिकेत आहे आणि नवाजच्या अपोझिट ...
‘ ाबूमोशाय बंदूकबाज’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येतो आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यात मुख्य भूमिकेत आहे आणि नवाजच्या अपोझिट आहे, ती बंगाली अभिनेत्री बिदिता बाग. खरे तर या चित्रपटात सर्वप्रथम अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिची वर्णी लागली होती. पण नवाजसोबतचे इंटिमेट सीन्स चित्रांगदाला म्हणे मान्य नव्हते. नवाजसोबत इंटिमेट सीन्स करण्यास तिने नकार दिला आणि अर्धे अधिक शूटींग झाल्यावर चित्रपटाला राम राम ठोकून चालती झाली. (अर्थात चित्रांगदाचे म्हणणे काही वेगळेच आहे. दिग्दर्शक कुशन नंदी माझ्याकडून बळजबरीने सेक्स सीन्स करून घेऊ इच्छित होता, असा तिचा आरोप आहे.) चित्रांगदाने हा चित्रपट सोडला आणि तिच्याजागी बिदिता बाग हिची वर्णी लागली. बिदिता यामुळे सध्या भलतीश खूश आहे. चित्रांगदाचे मी मनापासून आभार मानते. कारण ती या चित्रपटातून बाहेर पडली नसती तर मला हा चित्रपट मिळालाच नसता, असे बिदिता आता बेधडक सांगू लागलीय.
ALSO READ : ‘बाबुमोशाय बंदुकबाज’चा ट्रेलर आला!
चित्रांगदाची जागा घेतल्यानंतर तुला काही दबाब जाणवतो आहे का? या प्रश्नावरही बिदिताने असेच बेधडक उत्तर दिले. चित्रांगदा बॉलिवूडची एक मोठी अभिनेत्री आहे, हे मला ठाऊक आहे. पण तिची जागा घेतल्यामुळे मी अजिबात दबावात नाही. माझ्यातील अभिनय कला प्रगल्भ करण्यासाठी मी धडपडते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी यावर काम करते आहे. पण म्हणून दबाव नाहीच. फॅशन आणि मॉडेलिंग जगतातील मी एक लोकप्रीय चेहरा आहे. अनेक बांगला चित्रपटांत मी काम केले आहे. त्यामुळे स्वत:ला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही, असे ती म्हणाली.
एकंदर काय तर, चित्रांगदा या चित्रपटातून गेली काय आणि तिच्या जागी स्वत:ची वर्णी लागली काय, याच्याशी बिदिताला फार देणेघेणे नाही. संधी मिळाली आणि या संधीचे सोने करायचे कदाचित इतकेच बिदिताने पक्के ठरवलेले दिसतेय.