या सरकारी परीक्षेत नापास झाले होते बिग बी अमिताभ बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 05:01 AM2017-10-11T05:01:16+5:302017-10-11T10:31:16+5:30

किती काळ गेला तरी शहेनशाह अमिताभ बच्चन यांची जादू काही कमी झालेली नाही. आज ही नवीन पिढीच्या कलाकारांना ते ...

Big B Amitabh Bachchan went missing in government exams | या सरकारी परीक्षेत नापास झाले होते बिग बी अमिताभ बच्चन

या सरकारी परीक्षेत नापास झाले होते बिग बी अमिताभ बच्चन

googlenewsNext
ती काळ गेला तरी शहेनशाह अमिताभ बच्चन यांची जादू काही कमी झालेली नाही. आज ही नवीन पिढीच्या कलाकारांना ते तगडी कॉम्पिटिशन देतात. बॉलिवूडमध्ये किती आले आणि किती गेले पण अमिताभ यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. अमिताभ यांना हे स्थान इतक्या सहजा सहजी नाही मिळालेले नाही. त्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट करावे लागले आहेत. जी मेहनत प्रत्येक कलाकाराला घ्यावी लागते. 

अमिताभ यांच्या करिअरची सुरुवात संघर्षानेच झाली. त्यांनी आतापर्यंत अनेक चढ-उतार आयुष्यात पाहिले आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल की आपल्या भारी भक्कम आवाजाने ओळखले जाणारे बिग बी एकेकाळी आकाशवाणीच्या परीक्षेत आपल्या आवाजामुळे नापास झाले होते. ते जेव्हा केव्हा चित्रपटात काम मागायला जायाचे तेव्हा लोक त्यांना रिजेक्ट करायचे.

दिग्दर्शकांचे म्हणणे होते की सडपातळ बांध्याचा आणि उंचीने जास्त असलेला व्यक्तीमध्ये अशी काहीच क्वालिटी नाही की जो पडद्यावर हिरो म्हणून वावरले आणि त्याला कोणीच पसंत करणार नाही. त्यानंतर त्यांनी 'सात हिंदुस्तानी आणि 'रेश्मा और शेरा' सारख्या चित्रपटात छोट्या भूमिका साकारून आपली छाप पडण्यास सुरुवात केली. अमिताभ यांना सुरुवातीला काम मिळायचे मात्र त्यांचे चित्रपट फारशा काही चालायचे नाहीत किंवा मग पूर्णपणे फ्लॉप व्हायचे. त्यांच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरला तो जंजिर चित्रपट. या चित्रपटातून ते प्रकाश झोतात आले. प्रकाश मेहराना एका हॉलिवूडच्या दिग्दर्शकाने एक युक्ती सांगितली होती, ती अशी की दुबळ्या बारीक माणसाच्या हातात बंदूक द्या चित्रपट सुपरहिट होणार.

ALSO READ :  या कारणामुळे अमिताभ बच्चन करणार नाही सलमान खानसोबत काम!

प्रकाश मेहरांनी अगदी तेच केले  आणि 'जंजिर' हा सुपरहिट झाला. पुढचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इथूनच पुढे अमिताभ बच्चन युगाचा जन्म झाला. ज्याला सगळे 'अँग्री यंग मॅन' म्हणून ओळखू लागले. ज्यांनी बॉलिवूडची दिशाच बदलून टाकली. आज अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे सरताज,शहेनशाह अशा अनेक नावाने ओळखले जाते. 

Web Title: Big B Amitabh Bachchan went missing in government exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.