​सेन्सॉर बोर्डाच्या निशान्यावर आता बिग बींचा ‘सरकार ३’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 03:50 PM2017-02-21T15:50:51+5:302017-02-21T21:20:51+5:30

बॉलिवूड चित्रपटांना प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. चित्रपटातील दृष्यांवर आक्षेप घेण्यासाठी ख्यात असलेल्या सेन्सॉर बोर्डावर अनेक चित्रपट निर्मात्यांनी ...

Big Bica 'Government 3' on the Scene of the Censor Board | ​सेन्सॉर बोर्डाच्या निशान्यावर आता बिग बींचा ‘सरकार ३’

​सेन्सॉर बोर्डाच्या निशान्यावर आता बिग बींचा ‘सरकार ३’

googlenewsNext
लिवूड चित्रपटांना प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. चित्रपटातील दृष्यांवर आक्षेप घेण्यासाठी ख्यात असलेल्या सेन्सॉर बोर्डावर अनेक चित्रपट निर्मात्यांनी आक्षेप नोंदविला आहे. आता सेन्सॉर बोर्डाच्या निशान्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट ‘सरकार ३’ आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे कुणाच्यातरी सांगण्यावरून असे करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. 

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी ‘सरकार ३’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून हा ट्रेलर पाहून या चित्रपटातील काही दृष्ये कमी करण्यात यावी असा आदेश सेन्सॉर बोर्डाने दिला आहे. मीडियात आलेल्या बातम्यानुसार सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही सिन्स कमी करण्यास सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या मते, या चित्रपटात ज्या प्रकारे अमिताभ यांच्या भूमिकेला रंगविण्यात आले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो. लोकांपर्यंत बाळासाहेबांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडली जाऊ नये असे वाटू लागले आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढक लली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. 



सरकार ३ चे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा करीत आहे. २००५ साली प्रदर्शित झालेल्या सरकार चित्रपटाचा हा तिसरा भाग आहे. सरकारचा दुसरा भाग २००८ साली सरकार राज नावाने प्रदर्शित क रण्यात आला होता. सरकार हा चित्रपट भारतीय राजकारणावर आधारित असून सरकार ३मध्ये देखील राजकारणातील गुपिते खुली केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. 

मागील काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्ड चांगलाच वादात सापडला आहे. नुकतेच जॉली एलएलबी २ या चित्रपटात लावण्यात आलेले चार कट्समुळे सेन्सॉर चर्चेत आला होता. मोदी यांच्या राजकारणावर आधारित चित्रपटाला पीएमओकडून परवाणगी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला होता. तर सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’ हा चित्रपट मागील वर्षांपासून सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची वाट पाहतो आहे. 

Web Title: Big Bica 'Government 3' on the Scene of the Censor Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.