बिग बॉसमधील हे स्पर्धक अडकणार लग्नाच्या बंधनात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 10:07 AM2017-11-01T10:07:10+5:302017-11-01T15:37:10+5:30
बिग बॉसमध्ये आजवर आपल्याला अनेक प्रेमकथा पाहायला मिळाल्या आहेत. अनेक जण बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकदा ...
ब ग बॉसमध्ये आजवर आपल्याला अनेक प्रेमकथा पाहायला मिळाल्या आहेत. अनेक जण बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकदा या घरातून बाहेर पडले की, ब्रेकअप करून मोकळे होतात. त्यामुळे बिग बॉसमधील कपल हे कार्यक्रम जिंकण्यासाठी एकमेकांचा वापर करतात असे देखील अनेक वेळा म्हटले जाते. पण या सगळ्यांमध्ये आता एक कपल अपवाद ठरणार आहे. बिग बॉसमधील एक कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
बिग बॉसमधील हे कपल एकाच सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात गेले नव्हते. अश्मित पटेलने बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये तर महक चहलने या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. अश्मित बिग बॉसच्या घरात असताना वीणा मलिक आणि त्याच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा देखील झाली होती. पण अश्मित वीणावर नव्हे तर महेकवर प्रेम करत असल्याचे त्याने अनेकवेळा कबूल केले आहे. या दोघांच्या प्रेमकथेविषयी अश्मित सांगतो, आम्ही गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. अनेक पार्टींमध्ये आम्ही अनेकवेळा भेटलो आहोत. आम्ही वांद्रेला एकाच जिममध्ये अनेक वर्षं जात आहोत. पण आमच्यात अनेक वर्षं केवळ फ्रेंडशिप होती. पण एका दिवशी खूप पाऊस पडत होता. जिममध्ये येताना तिने तिची कार आणली नव्हती. त्यामुळे मी तिला घरी सोडण्याची ऑफर केली. त्यानंतर आम्ही कार्टर रोडवरील भुट्टा खायला थांबलो. तिथे बसून आम्ही अनेक तास गप्पा मारत होतो. त्याचवेळी आमच्यात मैत्री पेक्षा अधिक काहीतरी असल्याची आम्हाला जाणीव झाली.
अश्मित आणि महक पुढच्या वर्षीच्या जुलै महिन्यात लग्न करणार आहेत. ते सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. महक आणि तो सध्या वांद्र्यात राहात आहेत. ते दोघे मुंबईत लग्न करणार की मुंबईच्या बाहेर हे अद्याप तरी कळलेले नाही. पण अश्मितचे अनेक नातेवाईक पॅरिसमध्ये राहात असल्याने ते पॅरिसमध्ये देखील लग्न करू शकतात असे म्हटले जात आहे.
अश्मित आणि महकने काही महिन्यांपूर्वी पॉवर कपल या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
Also Read : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने दिला पती असद खटकला घटस्फोट