BIG ऑफर : ​केआरकेला फॉलो करा अन् ५ लाख मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 07:34 AM2017-05-23T07:34:19+5:302017-05-23T13:04:19+5:30

आपल्या वादग्रस्त tweetsने कायम चर्चेत राहणारा केआरके अर्थात कमाल आर खान याने लोकांना एक मोठी आॅफर दिली आहे. केआरकेची ...

BIG offer: Follow KKK and get 5 million! | BIG ऑफर : ​केआरकेला फॉलो करा अन् ५ लाख मिळवा!

BIG ऑफर : ​केआरकेला फॉलो करा अन् ५ लाख मिळवा!

googlenewsNext
ल्या वादग्रस्त tweetsने कायम चर्चेत राहणारा केआरके अर्थात कमाल आर खान याने लोकांना एक मोठी आॅफर दिली आहे. केआरकेची ही आॅफर ऐकून भल्या भल्यांचे कान टवकारल्याशिवाय राहणार नाहीत. होय, केआरकेची ही आॅफर तुम्हाला लक्षाधीश बनवू शकते. आता ही आॅफर कुठली हे ऐकायला तुम्ही अधीर झाला असालच. त्यामुळे तुमच्या संयमाची फार परीक्षा न घेता, आम्ही केआरकेची आॅफर तुम्हाला सांगणार आहोत. येत्या ३१ मेपर्यंत  twitterवर मला फॉलो करा आणि पाच लाख मिळवा, अशी आॅफर केआरकेने दिली आहे. होय, ३१ मे २०१७ पर्यंत जो कुणी मला  twitterवर फॉलो करेल, त्याच्या अकाऊंटमध्ये मी १ जून २०१७ पर्यंत ५ लाख रुपए ट्रान्फर करेल, असे tweet केआरकेने केले आहे.

{{{{twitter_post_id####}}}}


ALSO READ : Tweet war : स्वरा भास्करने केआरके म्हटले ‘कॅरेक्टरलेस’

केआरकेसारखी आॅफर आजपर्यंत कुठल्या राजकीय नेत्यानेही दिली नसेल. तूर्तास केआरकेचे ४० लाख फॉलोअर्स आहेत. या आॅफरनंतर निश्चितपणे केआरकेच्या फॉलोअर्सची संख्या आणखी कित्येक पटींनी वाढेल. केआरकेच्या या आॅफरमागे काय कारण आहे, हे अद्याप कळलेले नाही. कदाचित लोकांना मूर्ख बनवून फॉलोअर्स वाढवण्याची त्याची ही कुठली कुरापत असावी. आता खरे काय, हे तर १ जूनलाच कळेल. कारण १ जूनपर्यंत नव्या फॉलोअर्सच्या खात्यात ५ लाख रुपए ट्रान्फर करणार आहे.

केआरके कायम त्याच्या tweetsनी चर्चेत असतो. बड्या बड्या स्टार्सला लक्ष्य करणे हा केआरकेचा आवडता उद्योग. स्वत:ला देशातील सर्वात मोठा क्रिटिक मानणा-या केआरकेने आत्तापर्यंत अनेकांशी पंगा घेतला आहे. अलीकडे मदर्स डेच्या दिवशी केआरकेने एक विचित्र tweet केले होते. माझी आई मला विष देऊन मारू इच्छित होती, असे त्याने म्हटले होते.

Web Title: BIG offer: Follow KKK and get 5 million!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.