रवी किशन यांना मोठा दिलासा; DNA टेस्ट करण्यास कोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 04:12 PM2024-04-26T16:12:24+5:302024-04-26T16:12:49+5:30
Ravi kishan : रवी किशन आपले वडील असल्याचा दावा एका तरुणीने केला आहे.
Ravi kishan Got Relief In DNA Test: अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांना मुंबईतील न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी एका 25 वर्षीय महिलेची याचिका फेटाळून लावली, ज्यात तिने रवी किशन यांची DNA चाचणी करण्याची मागणी केली होती. रवी किशन वडील असल्याचा दावा त्या मुलीने केला आहे.
The Dindoshi Sessions Court in Mumbai has rejected the plea of a 25-year-old girl seeking a DNA Test claiming to be the daughter of BJP MP & Actor Ravi Kishan.
— ANI (@ANI) April 26, 2024
न्यायालयाने काय म्हटले?
मुंबईतील रहिवासी असलेल्या अपर्णा सोनी यांनी दावा केला होता की, रवी किशन यांच्यापासून त्यांना शिनोवा नावाची मुलगी झाली आहे. त्यांच्या दाव्याच्या एका आठवड्यानंतर आता न्यायालयाचा निर्णय आला. आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने सांगितले की, अपर्णा सोनी आणि रवी किशन यांच्यात संबंध असल्याचा पुरावा नाही.
शिनोवाने काय म्हटले
गुरुवारी कोर्टात शिनोवाने दावा केला की, ती रवी किशन यांना काका म्हणते, पण तेच तिचे बायलॉजिकल वडील आहेत. दरम्यान, रवी किशनची बाजू मांडणारे वकील अमित मेहता यांनी त्यांच्या अशीलाचा अपर्णा सोनी यांच्याशी काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद कोर्टात केला. मेहता यांनी कबूल केले की, रवी किशन आणि अपर्णा सोनी चांगले मित्र आहेत, दोघांनी चित्रपटसृष्टीत एकत्र काम केले आहे. पण, दोघे कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते.
BJP MP Ravi Kishan's daughter is requesting Yogi Adityanath for a one is to one meeting so that she can show proof of being the real daughter of the BJP MP Ravi Kishan.pic.twitter.com/8T1EbUsCri
— Ravinder Kapur. (@RavinderKapur2) April 16, 2024
शिनोवाचे वकील काय म्हणाले?
शिनोवाच्या याचिकेवर युक्तिवाद करताना वकील अशोक सरावगी यांनी डीएनए चाचणीची मागणी केली. सरोगी यांनी म्हटले की, अपर्णा सोनी यांनी 1991 मध्ये राजेश सोनीशी लग्न केले. परंतु काही वाद आणि मतभेदांमुळे त्यांनी 1995 मध्ये घर सोडले. यानंतर त्या रवी किशन यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांचापासून शिनोवा नावाची मुलगी झाली. शिनोवाच्या जन्मानंतर रवी त्यांची काळजी घ्यायचे, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांनी नाते नाकारण्यास सुरुवात केली, असा युक्तीवाद वकीलाने केला.
रवी किशनच्या पत्नीने एफआयआर दाखल केली
या प्रकरणी रवी किशनची पत्नी प्रीती शुक्ला यांनी अपर्णा सोनी आणि शिनोवा यांच्याविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल केला आहे. त्याआधारे पोलिसांनी अपर्णा सोनी, तिचा पती राजेश सोनी, मुलगी शिनोवा, मुलगा सौनक सोनी, समाजवादी पक्षाचे नेते विवेक कुमार पांडे आणि यूट्यूब चॅनल चालवणारे पत्रकार खुर्शीद खान या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.