मोठा खुलासा : अखेर ‘जग्गा जासूस’मधून गोविंदाचा पत्ता कट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 03:42 PM2017-06-29T15:42:45+5:302017-06-29T21:12:45+5:30

गोविंदाची भूमिकाच चित्रपटातून गायब करण्यात आली आहे. याचा खुलासा दस्तुरखुद्द दिग्दर्शक अनुराग बासू यांनीच केला आहे.

Big Spot: Finally, 'Jagga Detectives' cut Govinda's address! | मोठा खुलासा : अखेर ‘जग्गा जासूस’मधून गोविंदाचा पत्ता कट!!

मोठा खुलासा : अखेर ‘जग्गा जासूस’मधून गोविंदाचा पत्ता कट!!

googlenewsNext
ही वेळापूर्वीच अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर बघितल्यानंतर प्रत्येकाला एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे ट्रेलरमध्ये गोविंदाला का दाखविण्यात आले नाही? वास्तविक काही दिवसांपूर्वीच ‘जग्गा जासूस’च्या सेटवरून त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. फोटोवरून चित्रपटात तो योगी बाबाच्या भूमिकेत असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानंतर प्रत्येकालाच गोविंदाचा हा अवतार ट्रेलरमध्ये बघावयास मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. कारण गोविंदाची भूमिकाच चित्रपटातून गायब करण्यात आली आहे. याचा खुलासा दस्तुरखुद्द दिग्दर्शक अनुराग बासू यांनीच केला आहे. 

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान अनुराग बासू याने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, होय, गोविंदाने काही काळापूर्वीच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. गोविंदाचा तुम्ही जो फोटो बघितला आहे, तो ‘जग्गा जासूस’च्या सेटवरीलच आहे. मात्र काळानुरूप चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बरेचसे बदल करण्यात आले, ज्यामुळे गोविंदाची भूमिका चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बसत नव्हते. अखेर त्याची भूमिका चित्रपटातून गायब करण्यात आली. गोविंदानेदेखील यासाठी फारसा विरोध न करता निर्मात्यांच्या निर्णयाला संमती दर्शविली. वास्तविक चित्रपटात गोविंदा गेस्ट अपियरेन्स म्हणून होता. त्याची काही महत्त्वपूर्ण भूमिका नव्हती, असेही अनुराग बासूने स्पष्ट केले. 



आता गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे ‘जग्गा जासूस’मध्ये गोविंदा बघावयास मिळणार नाही. खरं तर या चित्रपटाला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागत आहे. चित्रपट बनविण्यासाठीच तब्बल दोन वर्षांचा अवधी लागला आहे. या काळात स्क्रिप्टमध्ये सातत्याने बदल करावे लागले. आता त्याच बदलामुळे गोविंदाचीही भूमिका चित्रपटातून काढण्यात आली आहे. जे गोविंदाचे फॅन्स आहेत, त्यांच्याकरिता ही बातमी दु:खदायक असेल यात शंका नाही. 

Web Title: Big Spot: Finally, 'Jagga Detectives' cut Govinda's address!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.