"...तर त्याला लकवा मारला असता" सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:04 IST2025-01-17T09:03:37+5:302025-01-17T09:04:14+5:30
सैफवर उपचार करणाऱ्या लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (saif ali khan)

"...तर त्याला लकवा मारला असता" सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं मोठं वक्तव्य
काल पहाटे (१६ जानेवारी) सैफ अली खानवर (saif ali khan) एका चोराने घरात घुसून हल्ला केला. त्यामुळे सैफला तातडीने रुग्णालायात दाखल करण्यात आलं. सैफच्या शरीरावर जखमा झाल्याने त्याच्या प्रकृतीविषयी चाहत्यांना चिंता वाटली. सैफच्या मणक्यात असलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी सर्जरी करुन बाहेर काढला. त्यामुळे सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे. सैफच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी मोठी अपडेट दिली आहे. चाकू अजून आत घुसला असता तर सैफच्या लकवा मारण्याची जास्त शक्यता होती असं वक्तव्य डॉक्टरांनी केलंय.
सैफच्या प्रकृतीविषयी काय म्हणाले डॉक्टर?
सैफ अली खानच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या. त्यापैकी दोन जखमा जास्त गंभीर होत्या. लीलावती हॉस्पिटलमधील डॉ. नितिन डांगे यांनी सैफवर उपचार केले. डॉ. डांगेंनी सैफच्या प्रकृतीविषयी अपडेट देताना सांगितलं की, "सैफ अली खान आता ठीक आहेत. चाकू हल्ला झाल्यावर सैफच्या दोन जखमा गंभीर होत्या. याशिवाय त्याच्या शरीरावर ४ किरकोळ घाव होते. त्यापैकी २.५ इंचाचा एका चाकूचा तुकडा सैफच्या मणक्यात अडकला होता. जर हा तुकडा आणखी खोल घुसला असता तर सैफला लकवा मारला असता. परंतु देवाच्या आशीर्वादाने सैफची सर्जरी करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे आता तो सुखरुप आहे."
सैफ घरी कधी परतणार?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सैफ अली खानला पुढील दोन-तीन दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळेल. सध्या सैफवर लवकरच फिजिओथेरपी सुरु होईल. त्यानंतर सैफ या दुखण्यातून लवकरात लवकर बरा होईल. याशिवाय येत्या महिन्याभरात तो पुन्हा शूटिंगला सुरुवात करेल. सैफचे चाहते अभिनेता ठणठणीत बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. इतक्या मोठ्या हल्ल्यातून सैफ वाचला आहे. जर घाव आणखी गहिरे असते तर सैफचं करिअर आणि जीव दोन्ही धोक्यात आला असता.