भूमी पेडणेकरने करण जोहरच्या 'तख्त'बाबत केले 'हे' मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 22:00 IST2018-08-15T20:01:51+5:302018-08-15T22:00:00+5:30
बॉलिवूडमध्ये 'दम लगाके हईशा', 'शुभ मंगल सावधान' आणि 'टॉयलेट:एक प्रेमकथा'सारख्या हीट सिनेमामधून भूमी पेडणेकरने आपला दमदार अभिनय सादर केला आहे.

भूमी पेडणेकरने करण जोहरच्या 'तख्त'बाबत केले 'हे' मोठे वक्तव्य
बॉलिवूडमध्ये 'दम लगाके हईशा', 'शुभ मंगल सावधान' आणि 'टॉयलेट:एक प्रेमकथा'सारख्या हीट सिनेमामधून भूमी पेडणेकरने आपला दमदार अभिनय सादर केला आहे. लवकरच ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. भूमी लवकरच करण जोहरच्या 'तख्त' या पीरियड ड्रामा सिनेमात दिसणार आहे.
भूमी या सिनेमाबबात बोलताना म्हणाली, मला वाटले नव्हते ऐवढ्या मोठा सिनेमा इतक्यात माझ्या वाटेला येईल. मी आभारी आहे की 'तख्त'चा हिस्सा बनवण्याची संधी दिली. ती पुढे म्हणाली, तख्तमध्ये जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांची मी फॅन आहे आणि त्यांच्यासोबत काम करायला मजा येणार आहे. तसेच करण जोहरची तर मी लहानपणापासूनच फॅन आहे त्यामुळे मी 'तख्त'चा भाग आहे याचा मला आनंद आणि अभिमान देखील आहे.
‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. आलिया रणवीरच्या प्रेयसीची तर करिना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. जान्हवी कपूर विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार. या मल्टीस्टारर चित्रपटाचे संवाद हुसैन हैदरी लिहिणार आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.