‘बिग बॉस12’साठी सलमान खानला गाळावा लागणार घाम! ‘हे’ आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 08:22 AM2018-08-10T08:22:44+5:302018-08-10T08:22:44+5:30

‘बिग बॉस12’ची तयारी सुरू झाली आहे. यंदाचे बिग बॉसचे १२ वे सीझनही सलमान खान हाच होस्ट करणार आहे. पण एक अडचण आहे. ही अडचण आहे वाढलेल्या वजनाची. 

bigg boss 12 salman khan ha to reduced weight due to close framed cameras | ‘बिग बॉस12’साठी सलमान खानला गाळावा लागणार घाम! ‘हे’ आहे कारण!!

‘बिग बॉस12’साठी सलमान खानला गाळावा लागणार घाम! ‘हे’ आहे कारण!!

googlenewsNext

‘बिग बॉस12’ची तयारी सुरू झाली आहे. यंदाचे बिग बॉसचे १२ वे सीझनही सलमान खान हाच होस्ट करणार आहे. पण एक अडचण आहे. ही अडचण आहे वाढलेल्या वजनाची. होय, आपल्या याआधीच्या काहीचित्रपटांसाठी सलमान खानने वजन वाढवले होते. चित्रपट संपलेत पण हे वजन काही कमी झाले नाही आणि आता त्याचे हे वाढलेले वजन ‘बिग बॉस12’साठी मोठी अडचण ठरतेय. त्यामुळे खास ‘बिग बॉस12’साठी सलमानला आपले काही किलो वजन घटवावे लागणार आहे. कारण आहे ‘बिग बॉस’साठी वापरले जाणारे कॅमेरे. या कॅमे-यांचे क्लोज फ्रेम. होय, या कॅमे-यांत माणसाचे वजन तसेही वाढलेले दिसते. खरे तर हे कॅमेरे फक्त स्पर्धकांसाठी असतात. पण तरिही सलमानला या शोसाठी वजन कमी करावे लागणार आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, सलमानने याची तयारीही सुरू केली आहे. ‘भारत’च्या शूटींगसोबतचं सलमान स्वत:चे वजन कमी करण्याचे प्रयत्न करणार आहे. यासाठी एक खास ट्रेनर त्याच्यासोबत माल्टा येथे त्याच्यासोबत असणार आहे. लवकरच माल्टा येथे ‘भारत’चे शूटींग सुरू होईल. नोरा फतेही या चित्रीकरणासाठी कधीच रवाना झाली आहे. नोरा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल.   या सिनेमात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते.  या चित्रपटात सलमान खानची वेगवेगळी रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. म्हणजे तरूण ते वृद्ध अशा वेगवेगळ्या रूपात तो दिसेल. 

 

Web Title: bigg boss 12 salman khan ha to reduced weight due to close framed cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.