Bigg Boss 14 Finale: रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14ची चॅम्पियन; राहुल वैद्यला मागे टाकत मारली बाजी

By मुकेश चव्हाण | Published: February 22, 2021 12:33 AM2021-02-22T00:33:58+5:302021-02-22T07:17:23+5:30

Rubina Dilaik Bigg Boss 14 Finale Winner: गेल्या 20 आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या सीझनला अखेर विजेता मिळाला आहे. 

Bigg Boss 14 Finale: Rubina Dilaik winner of Bigg Boss 14 | Bigg Boss 14 Finale: रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14ची चॅम्पियन; राहुल वैद्यला मागे टाकत मारली बाजी

Bigg Boss 14 Finale: रुबीना दिलैक ठरली बिग बॉस 14ची चॅम्पियन; राहुल वैद्यला मागे टाकत मारली बाजी

googlenewsNext

मुंबई: गेल्या 20 आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या सीझनला अखेर विजेता मिळाला आहे. राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अखेर रुबीना दिलैकने (Rubina Dilaik Winner Big Boss 14) बाजी मारत बिग बॉस 14व्या सीझनची विजेता ठरली आहे. तर  राहुल वैद्य (Rahul Vidya) बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला आहे.

वोट कमी पडल्यामुळे बिग बॉसच्या घरातून अली गोनी बाहेर पडला होता. अली बेघर झाल्यानंतर घरातील सदस्यांना देखील मोठा धक्का बसला होता. अली गोनीनंतर निक्की तांबोळी घराबाहेर पडली होती. त्यानंतर बिग बॉस 14 ची विजेता म्हणून रुबीना दिलैकच्या नावाची घोषणा करण्यात आली. राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला आहे.

बिग बॉस विजेत्याला ट्रॉफी आणि 50 लाख रोख रक्कम मिळणार होती. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली. कारण एका टास्कमध्ये घरातील सदस्य राखी सावंत या रकमेपैकी 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडली. त्यामुळे विजेती रुबीनाच्या वाट्याला 44 लाख रुपये आलेत. ज्यावेळी राखी घराबाहेर पडली त्यावेळी सलमानने राखीला विचारले होते की, तुला काय वाटते बिग बॉस कोण जिंकेल त्यावेळी रूबीना जिंकली पाहिजे, असं मला वाटतं असं राखी म्हणाली होती. 

बिग बॉस सीझन 14 च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात सलमान खानने आपल्या शैलीत केली. सर्व स्पर्धकांच्या नातेवाईकांनी या महाअंतिम सोहळ्याला  हजेरी लावली होती. तसेच अभिनेता रितेश देशमुख देखील बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित होता.

Read in English

Web Title: Bigg Boss 14 Finale: Rubina Dilaik winner of Bigg Boss 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.