Bigg Boss 15 : रिया चक्रवर्तीला 'बिग बॉस'साठी ऑफर झाली इतकी रक्कम, ठरेल आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 20:17 IST2021-09-30T20:17:23+5:302021-09-30T20:17:53+5:30
रिया चक्रवर्ती बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

Bigg Boss 15 : रिया चक्रवर्तीला 'बिग बॉस'साठी ऑफर झाली इतकी रक्कम, ठरेल आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. त्याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती सतत चर्चेत येत होती. त्यावेळी सुशांत आणि रिया रिलेशनशीपमध्ये होती. त्यामुळे त्याच्या मृत्यून अनेकांनी तिच्यावर टीका केली. सुशांतच्या कुटुंबीयांनी देखील तिच्यावर गंभीर आरोप केले होते. सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान रियाला ड्रग्स कनेक्शनमध्ये बराच काळ तुरुंगात काढावा लागला. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. कारण रिया बिग बॉसच्या १५ सीझनमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
रिया चक्रवर्तीबिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. वृत्तानुसार, निर्मात्यांनी रियाला शोसाठी ऑफर केल्याचे समजते आहे. रिया चक्रवर्ती सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १५ मध्ये दिसू शकते. पण याबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
झूमच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी रिया अंधेरीच्या एका स्टुडिओमध्ये स्पॉट झाली होती. तिथे बिग बॉस १५चे स्पर्धक देखील उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चेला उधाण आले. असा दावा केला जातो आहे की रिया शोचा एक भाग आहे आणि ती प्रीमियरच्या रात्री परफॉर्म करताना दिसणार आहे.
दरम्यान आता ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला निर्मात्यांनी दर आठवड्याला ३५ लाख रुपये देऊ केले आहेत.जर हे वृत्त खरे असेल तर रिया चक्रवर्ती बिग बॉसची आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक ठरेल.
बिग बॉस १५ मध्ये यंदा तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, सिंबा नागपाल, अफसाना खान आणि प्रतीक जयसवाल हे दिसणार असल्याचे बोलले जात आहे.