योगिता चव्हाणला पती सौरभने दिलं खास सरप्राईज, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:13 IST2024-12-25T13:13:36+5:302024-12-25T13:13:50+5:30

आज 25 डिसेंबरच्या दिवशी जगभरात नाताळ सण साजरा केला जातोय.

Bigg Boss Fame Yogita Chavan's Husband Saurabh Chougule Gave Her A Special Christmas Surprise Watch Video | योगिता चव्हाणला पती सौरभने दिलं खास सरप्राईज, पाहा व्हिडीओ

योगिता चव्हाणला पती सौरभने दिलं खास सरप्राईज, पाहा व्हिडीओ

Christmas 2024 : आज 25 डिसेंबरच्या दिवशी जगभरात नाताळ सण साजरा केला जातोय. खरं तर नाताळ म्हणजे ख्रिसमस हा धार्मिक सण आहे. ख्रिश्चन धर्मियांचा हा सण आहे. पण सर्वच धर्मीय हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. प्रत्येक घरात एक सुंदर ख्रिसमस ट्री सजवला जातो. आपले लाडके मराठी सेलिब्रिटींदेखील मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलिब्रेश करतात.

'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनीदेखील ख्रिसमस सेलिब्रेशनं केलं आहे. खास गोष्ट म्हणजे योगिताला ख्रिसमस आवडतो म्हणून सौरभने ती घरी नसताना खास डेकोरेशन करत तिला सरप्राईज दिलं. हे खास सरप्राईज पाहून योगिता भारावून गेली.  याबद्दल योगिताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. 

योगितानं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "Christmas मला किती आवडतो हे सौरभला माहीत होतं म्हणून, मी शूटिंगसाठी बाहेर गेलेले असताना त्याने घरात असा उद्योग केला. उद्योग म्हणजे एक मोठं सरप्राईज दिलं, ९ फुटांचं मोठं ख्रिसमस ट्री आणि इतकंच नाही तर ख्रिसमसचं डेकोरेशन (ज्यातलं खरंतर त्याला काही कळत नाही) पण मित्रांची मदत घेऊन खूप सुंदर असं डेकोरेशन घरभर केलं. आपला पार्टनर आपल्या आवडीनिवडींची (unreasonable आवडीनिवडींचा )किती काळजी घेतो हे बघून कोणालाही आनंदच होईल… आणि तो मला इतका ओळखतो की हे कॅप्शन लिहायला पण त्यानेच मदत केली. आता मी Santa ला नवसच करणार आहे की, पुढच्या सातजन्मात हाच नवरा मिळूदेत". योगितानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय. 


कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या सेटवर सौरभ आणि योगिताचे सूर जुळले. त्यानंतर खऱ्या आयुष्यातील प्रवास सुरू केला. ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दरम्यान, सौरभ-योगिताकडे मराठी कलाविश्वातील एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.
 

Web Title: Bigg Boss Fame Yogita Chavan's Husband Saurabh Chougule Gave Her A Special Christmas Surprise Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.