शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही...! इमरान हाश्मीने का केला खुलासा? काय आहे भानगड?

By रूपाली मुधोळकर | Published: December 10, 2020 11:14 AM2020-12-10T11:14:21+5:302020-12-10T11:15:17+5:30

सनी लिओनी आई तर इमरान हाशमी वडील…

Bihar student names Emraan Hashmi, Sunny Leone as parents | शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही...! इमरान हाश्मीने का केला खुलासा? काय आहे भानगड?

शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही...! इमरान हाश्मीने का केला खुलासा? काय आहे भानगड?

googlenewsNext
ठळक मुद्दे. तूर्तास तरी हा सगळा प्रकार म्हणजे, एखाद्याचा खोडसाळपणा असावा किंवा बेजबाबदारपणामुळे घडलेला प्रकार असावा, असे मानले जात आहे.

बिहारच्या मुजफ्फपूरमध्ये अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी या दोघांचा मुलगा शिकतोय, असे कोणी सांगितले तर तुम्हालाही धक्का बसेल. मुळात इमरान व सनीचे लग्न कधी झाले? असा प्रश्न तुम्हाला पडेल. लग्नच नाही तर मुलगा कुठून आला? असा सवालही तुमच्या मनात येईल. पण बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये इमरान व सनीचा मुलगा अचानक प्रकटला. आता कसा तर पुढे वाचा....

तर मुज्जफरापूरमधील एका कॉलेजात इमरान व सनीचा 20 वर्षांचा मुलगा शिकत असल्याचे उघडकीस आले आहे. येथील भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठाअंतर्गत येणा-या मीनापूरस्थित धनराज महतो कॉलेजात बीएच्या दुस-या वर्षात शिकणा-या एका विद्यार्थ्याने आपल्या अर्जात आई-वडिल म्हणून इमरान व सनीचे नाव लिहिले आहे. या विद्यार्थ्याचे नाव कुंदर कुमार आहे. अधिका-यांनी  या विद्यार्थ्याचे ओळखपत्राचे फोटो पाहिले तेव्हा तेही अवाक् झाले.  कुंदरच्या ओळखपत्रावर वडीलांचे नाव इमरान हाशमी असल्याचे नमूद आहे. तर आईच्या नावाच्या जागी सनी लिओनी असे लिहिले आहे.   या ओळखपत्रावरील घराचा पत्ता म्हणून काय आहे तर चुतूर्भूज स्थान परिसराचे नाव. चुतूर्भूज हा परिसर रेड लाइट एरिया म्हणून कुप्रसिद्ध आहे. 

आता हा योगायोग समजावा तर  एकाच घरातील तीन व्यक्तींची तीन वेगळी अडनावं कशी असू शकतील? हा प्रश्न आहे. तूर्तास तरी हा सगळा प्रकार म्हणजे, एखाद्याचा खोडसाळपणा असावा किंवा बेजबाबदारपणामुळे घडलेला प्रकार असावा, असे मानले जात आहे. आता या प्रकरणाचे चौकशी करण्याचे आधेश दिले आहेत. 

इमरान म्हणाला, हा माझा नाही...
इमरान व सनीच्या या अचानक उगवलेल्या मुलाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर त्याच्या ओळखपत्राचे फोटो व्हायरल होत आहेत. इमरान हाश्मीपर्यंत हा सगळा प्रकार पोहोचला तेव्हा त्याने यावर मोठी मजेदार प्रतिक्रिया दिली. ‘शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही’ असे ट्विट त्याने केले.
 

Web Title: Bihar student names Emraan Hashmi, Sunny Leone as parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.