HOTNESS ALERT : तुफान व्हायरल होत आहेत इलियाना डिक्रूजचे बोल्ड बिकिनी फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 11:19 IST2020-03-01T11:19:04+5:302020-03-01T11:19:16+5:30
पाहून व्हाल खल्लास...

HOTNESS ALERT : तुफान व्हायरल होत आहेत इलियाना डिक्रूजचे बोल्ड बिकिनी फोटो...
आपल्या मादक अदांनी चाहत्यांना रिझवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते. इलियाना बोल्ड फोटो शेअर करण्यात जराही कचरत नाही. तिने फोटो शेअर करायची देर की, तिचे फोटो व्हायरल होतात. गेल्या काही दिवसांपासून इलियाना चित्रपटांपासून दूर आहे. पण हॉट फोटोंमुळे मात्र ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या ती अंदमान-निकोबारमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. याठिकाणचे बिकिनीतील बोल्ड फोटो तिने शेअर केले आहेत.
इलियानाचा हा बोल्ड लूक आणि तिचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
लाखोंच्या संख्येने फॉलोव्हर्स आहेत. रुस्तम, रेड, बर्फी आणि बादशाहो यासारख्या सिनेमात काम करणा-या इलियानाने याआधीही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी क्रूजवरचे ब्लॅक बिकिनीतील फोटो तिने शेअर केले होते. इलियानाच्या या ब्लॅक बिकिनीतील फोटोला काहीच तासांत पाच लाखांवर लाईक्स मिळाले होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून इलियाना ऑस्ट्रेलियातील फोटोग्राफर अँड्रयूशी नीबॉनला डेट करत होती. तिने गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा होती. इतकेच नाही तर इलियाना प्रेग्नेंट असल्याचीही चर्चा रंगली होती. पण या सगळ्या चर्चा ख-या सिद्ध होण्याआधीच इलियाना आणि अँड्रयूचे ब्रेकअप झाले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच इलियाना जॉन अब्राहमसोबत ‘पागलपंती’ या सिनेमात दिसली होती. या मल्टिस्टारर चित्रपटाकडून इलियानाला बºयाच अपेक्षा होत्या. हा सिनेमा दणकून आपटला आणि इलियानाचा अपेक्षाभंग झाला.