शेजारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह,म्हणून अभिनेत्रीच झाली १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 18:02 IST2020-06-03T18:00:34+5:302020-06-03T18:02:23+5:30
कोरोनाची काहीही लक्षणं आढळत नाही तरीही काही सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली होती. याच भीतीमुळे सेलिब्रेटींनी सध्या कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे.

शेजारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह,म्हणून अभिनेत्रीच झाली १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन
देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण पसले आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊ जाहिर झाल्यापासून सारेच घरातच बंदिस्त आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग, वेळोवेळा हात धुणे अशा सगळ्या गोष्टी करत खबरादारी पाळतायेत. तरीही काहींना कोरोनाची बाधा झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशात कोरोनाची काहीही लक्षणं आढळत नाही तरीही काही सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली होती. याच भीतीमुळे सेलिब्रेटींनी सध्या कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे.
One of the resident in my apartment is tested covid positive and so it’s self isolation for all of us in the building for the next 14 days.... #redzonepic.twitter.com/l1MaTP7UDm
— bindu madhavi (@thebindumadhavi) May 30, 2020
दाक्षिणात्य अभिनेत्री बिंदु माधवीलाही कोरोनाचे चांगलीच धडकी भरवली आहे. तिच्या शेजारी राहणा-या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाली. याची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आणि सील करण्यात आले. बिंदूलानेही खबरदारी म्हणून तिच्याच राहत्या घरात स्वतःला क्वॉरंटाईन करून घेतले आहे.खुद्द बिंदुनेच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
दाक्षिणात्या सिनेसृष्टीत बिंदू खूप लोकप्रिय आहे. तिने 'अवकाई बिरयाणी' चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सा-यांची पसंती मिळवली होती.मोठा पडदा गाजवल्यानंतर तिने मालिका 'मगल' मध्येही झळकली होती. २०१७मध्ये तामिळ भाषेतील 'बिग बॉस' या शोमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.