भारताच्या ‘या’ क्रिकेटरच्या आयुष्यावरही बनणार आता बायोपिक !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 05:52 AM2018-05-27T05:52:47+5:302018-05-27T11:22:47+5:30

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपटू, खेळाडू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार होत असून त्या चित्रपटांना चाहते आणि प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळतो ...

Biopic is going to be made in the life of the cricketer of India! | भारताच्या ‘या’ क्रिकेटरच्या आयुष्यावरही बनणार आता बायोपिक !

भारताच्या ‘या’ क्रिकेटरच्या आयुष्यावरही बनणार आता बायोपिक !

googlenewsNext
ल्या काही वर्षांपासून क्रिकेटपटू, खेळाडू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार होत असून त्या चित्रपटांना चाहते आणि प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे त्या ठराविक खेळाडूच्या आयुष्यातील संपूर्ण झगड्याविषयी प्रेक्षकांनाही माहिती होते. अलीकडेच इमरान हाश्मी याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. पण, आता भारतीय क्रिकेट टीमच्या अजून एका क्रिकेटरचा नंबर लागला आहे. आता तुम्ही म्हणाल कोण? तर आम्ही आज तुम्हाला तेच सांगणार आहोत. आता सौरव गांगुलीच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याची चर्चा आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत आता सौरव गांगुली जाऊन बसणार आहे.  

अलीकडेच एका मुलाखतीत गांगुलीनेच स्पष्ट केले की, त्याने लिहिलेल्या ‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’ या त्याच्या आत्मचरित्रावर हा चित्रपट आधारित असणार आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिकेटपटूंसह मिल्खा सिंग, मेरी कोम यांच्यावरही चित्रपट तयार झाले होते. हॉकीपटू संदीप सिंगच्या जीवनावरील ‘सुरमा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सौरव गांगुलीच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सची असल्याचे कळते.

सौरव गांगुलीच्या या बायोपिकमध्ये काय असणार आहे याविषयी तर सगळयांनाच उत्सुकता लागली आहे. त्याने स्वत:नेच याबाबतचा खुलासा केला आहे. या बायोपिकमध्ये त्याचा लहानपणीपासूनचा प्रवास, त्यांची क्रिकेटर बनल्यानंतरची जर्नी, भारतीय क्रिकेट टीम, इनिंग्स, चेंडू धावा यामधील प्रवास या सगळयांच गोष्टींचा उलगडा आता या बायोपिकमधून होणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: Biopic is going to be made in the life of the cricketer of India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.