Bipasha Basu Baby Bump: प्रेग्नेंसीतही बिपाशा बासूचा बोल्ड अंदाज, ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 05:00 PM2022-08-17T17:00:26+5:302022-08-17T17:01:03+5:30
Bipasha Basu Pregnancy: अभिनेत्री बिपाशा बासूने बोल्ड फोटोशूट करून तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. आता तिने टाइट ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.
बिपाशा बासू (Bipasha Basu)ने ६ वर्षांपूर्वी २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हर(Karan Singh Grover)शी लग्न केले होते. बिपाशा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या बर्याच दिवसांपासून येत होत्या, पण अलीकडेच बिपाशा आणि करणने एका बोल्ड फोटोशूटद्वारे अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते आई-वडील होणार आहेत. करण आणि बिपाशाचे बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे आणि आता पुन्हा एकदा बिपाशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक बोल्ड रील शेअर केली आहे ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
बिपाशा बासूने नुकतेच एका फोटोशूटद्वारे ती आई होणार असल्याचे सांगितले आहे. शर्टचे फक्त एक बटण बंद करून, बिपाशा तिचा नवरा करणसोबत बेबी बंप दाखवत आहे. आता त्या पोस्टनंतर बिपाशाने तिच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसते आहे.
यात बिपाशा बासूने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा अतिशय टाइट फिटिंगचा पारदर्शक ड्रेस आहे. या व्हिडीओत तिचा बेबी बंपदेखील पाहायला मिळतो आहे.
बिपाशाने रील शेअर केला केला आहे ज्यामध्ये पार्श्वभूमीत एका लहान मुलाचा आवाज येत आहे की तिच्या आत एक बाळ आहे. बिपाशा या आवाजावर लिप सिंक करताना आणि पारदर्शक ड्रेसमध्ये दिसणार्या बेबी बंपवर हात फिरवताना दिसत आहे. बिपाशाच्या फॅन्स आणि फ्रेंड्सव्यतिरिक्त तिचा पती करण सिंग ग्रोव्हरनेही बिपाशाच्या या रिलवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले आहे की, बिपाशा खूपच सुंदर दिसत आहे आणि तिच्या पोटात माझे मूल आहे.