बिपाशा-करणची लेक नेमकी कोणासारखी दिसते? अभिनेत्रीनं शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:38 PM2024-06-12T12:38:25+5:302024-06-12T12:41:44+5:30

बिपाशा बासूच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? शेअर केला खास फोटो

Bipasha Basu drops adorable childhood pics with daughter Devi | बिपाशा-करणची लेक नेमकी कोणासारखी दिसते? अभिनेत्रीनं शेअर केला खास फोटो

बिपाशा-करणची लेक नेमकी कोणासारखी दिसते? अभिनेत्रीनं शेअर केला खास फोटो

Bipasha Basu karan singh grover Daughter  : बॉलिवूडचं लोकप्रिय कपल बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (karan singh grover) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतेच अभिनेत्री बिपाशा बासू हिनं लेक देवी हिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. देवीच्या फोटोसोबत बिपाशाने तिचेही लहानपणीचे फोटोही शेअर केले आहेत. 

बिपाशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी आणि लहानपणीची बिपाशा दिसतेय.  विशेष म्हणजे बिपाशाची लेक हुबेहूब तिची कॉपी असल्याचं दिसून येतं. बिपाशाने या फोटोला 'My mini me Mine' असं कॅप्शन दिलं आहे.  हा फोटो पाहून चाहतेही कमालीचे खूश झाले आहेत. त्यांनी या पोस्टवर अनेक कमेंट केल्या आहेत. इतकंच नाही तर देवी ही आई बिपाशासारखीच दिसत असल्याचं म्हटलं आहे. सेलिब्रिटीही बिपाशाच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी २०१६ मध्ये लग्न केलं होतं.  लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांच्या घरात चिमुकलीचं आगमन झालं. वयाच्या चाळीशीत बिपाशाने लेक देवी हिला जन्म दिला. पण, जन्मानंतर बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचं समजलं होतं. त्यानंतर तिच्या हृदयावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. एका मुलाखतीत बिपाशाने लेकीच्या सर्जरीबद्दल खुलासा केला होता. अनेकदा बिपाशा आणि करण लेकीबरोबरचे फोटो शेअर करत असतात. 

Web Title: Bipasha Basu drops adorable childhood pics with daughter Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.