Bipasha Basu Pregnant : प्रेग्नेंसीच्या वृत्तादरम्यान बिपाशा बासूची करण सिंग ग्रोव्हरसाठी खास पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:18 PM2022-07-30T17:18:05+5:302022-07-30T17:18:29+5:30
Karan Singh Grover And Bipasha Basu: करण आणि बिपाशा हे बॉलिवूडमधील आदर्श कपल्सपैकी एक आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचे लग्न ६ वर्षांपूर्वी एप्रिल २०१६ मध्ये झाले होते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आता बिपाशाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर येत आहे. असे बोलले जात आहे की, ही जोडी लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ शकते.
सध्या बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) तिच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर बिपाशा आई होणार असल्याचे बोलले जात आहे. करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) आणि बिपाशा आता आई-वडील होणार आहेत. मात्र, या वृत्ताला बिपाशा किंवा करणने दुजोरा दिलेला नाही. पण हो, प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान बिपाशाने एक खास पोस्ट नक्कीच शेअर केली आहे.
बिपाशा बासूने तिच्या प्रेग्नेंट असल्याच्या वृत्ताची पुष्टी केली नसेल, परंतु पती करण सिंग ग्रोव्हरच्या कौतुकात काहीतरी लिहिले आहे. बिपाशाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत करणचे कौतुक केले आहे. इंस्टा स्टोरीवर करणचा फोटो शेअर करून बिपाशाने १०० टक्के हॉटी लिहिले. बिपाशाने करणच्या कौतुकात काही लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा बिपाशा सोशल मीडियावर करणवर प्रेमाचा वर्षाव करत असते.
करण आणि बिपाशा हे बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत. करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू यांचे लग्न ६ वर्षांपूर्वी एप्रिल २०१६ मध्ये झाले होते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आता तिच्या प्रेग्नेंसीची बातमी येत आहे. असे बोलले जात आहे की, ही जोडी लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ शकते. बिपाशा आणि करणच्या घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांची पहिली भेट २०१५ मध्ये अलोन या हॉरर चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर करण आणि बिपाशाची मैत्री झाली. हळुहळु त्यांचे प्रेम फुलले आणि मग त्यांची मैत्री झाली. या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, बिपाशा २०२० मध्ये रिलीज झालेल्या डेंजरस या चित्रपटात दिसली होती. त्याचवेळी करण कुबूल है २.० मध्ये दिसला होता.