​बिपाशा बसूने लिहिले खुले पत्र; लंडनच्या आयोजकांवर बरसली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 09:20 AM2017-03-10T09:20:26+5:302017-03-10T14:50:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू अलीकडे चर्चेत आली तरी लंडनमधील एका फॅशन शोमुळे. आयोजकांची फसवणूक केल्याचा ठपका यानिमित्ताने बिपाशावर ठेवण्यात ...

Bipasha Basu wrote an open letter; London organizers anniversary! | ​बिपाशा बसूने लिहिले खुले पत्र; लंडनच्या आयोजकांवर बरसली!

​बिपाशा बसूने लिहिले खुले पत्र; लंडनच्या आयोजकांवर बरसली!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री बिपाशा बसू अलीकडे चर्चेत आली तरी लंडनमधील एका फॅशन शोमुळे. आयोजकांची फसवणूक केल्याचा ठपका यानिमित्ताने बिपाशावर ठेवण्यात आला आहे. गत ४ मार्चला ‘इंडिया-पाकिस्तान-लंडन फॅशन शो’ नामक एका शोचे आयोजन करण्यात आले होते.   बिपाशा या शोच्या ग्रँड फिनालेची शो स्टॉपर होती. पण  शो सुुरु होण्यास काही तास उरले असताना  बिपाशाने स्वत:ला हॉटेलच्या खोलीत बंद करून घेतले. रूममधून बाहेर येण्यास तिने नकार दिला, असे बिपाशाबद्दल सांगितले गेले होते. आयोजकांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून बिपाशावर अव्यावसायिकतेचा आरोप केला होता. बिपाशाने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. आता बिपाशाने यासंदर्भात एक खुले पत्र लिहिले असून त्यात आपली बाजू मांडली आहे.

ALSO READ : ​बिपाशा बसू आयोजकांवर रूसली अन् हॉटेलात जावून बसली!

बिपाशाने यात लिहिलेय की, माझ्या लंडन फॅशन शोबद्दल बरेच काही बोलले गेले आहे. माझ्या मते, याप्रकरणावर स्वत:ची बाजू मांडण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्यामते, स्वत:शी आणि  स्वत:च्या तत्त्वांशी प्रामाणिक असायला हवे. मी कायम स्वत:ची लढाई स्वत: लढली आहे. आमच्या कामात काही अडचणी येतातच. पण म्हणून स्वस्त लोकप्रीयता मिळवण्याचे प्रयत्न मी कधीच केले नाही. डिफॉल्टर्स व्हिक्टिम कार्ड खेळत असल्याचे पाहून आधी मला आश्चर्य वाटते. स्वत:ला खरे ठरवण्यासाठी त्यांनी फालतू कथा ऐकवल्या. मला चुकीचे ठरवले. पण आता मीडियाचा एक गटही या डिफॉल्टर्सचे समर्थन करताना दिसत आहे. सोशल मीडियाच्याच्या शस्त्राचा यासाठी वापर केला जात आहे. हे सगळे धक्कादायक आहे. मी थेटपणेच सांगते. काही अटींवर करार झाला होता. मी माझ्या प्लाननुसार लंडनला पोहोचले होते. पण आयोजक शब्दाबाहेर वागत असल्याचे मला जाणवले. काही आवश्यक गोष्टींची व्यवस्था करा, इथपर्यंत तयारी मी दाखवली होती. पण ते सगळ्यांच गोष्टींपासून पळ काढू पाहत होते. यापूर्वी इतकी वाईट वागणूक मला कुणीही दिली नव्हती. माझा आत्मसन्मान सगळ्यांत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी आयोजकांच्या मनसूब्यांना विरोध केला. मी लंडनला स्वत: माझे हॉटेल बुक केले आणि स्वत: आपला ट्रॅवल रिबुक केले.

Web Title: Bipasha Basu wrote an open letter; London organizers anniversary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.