Birth Anniversary Special : वयाच्या १४ व्या वर्षी नूतन यांनी केले होते अॅडल्ड सिनेमात काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 11:47 AM2019-06-04T11:47:26+5:302019-06-04T11:47:51+5:30
दिवंगत अभिनेत्री नूतन यांनी १९४५ साली आपल्या करियरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यांनी त्यांचे वडील कुमार सेन यांच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी १९५८ साली दिल्ली का ठग या चित्रपटात स्वीमसूट परिधान करून सर्वांना थक्क केले होते.
अनारी, सुजाता, पेइंग गेस्ट, सीमा, बंदिनी, सरस्वती चंद्र, मिलन आणि मैं तुलसी तेरे आँगन की यांसारख्या चित्रपटातून आपले अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या दिवंगत अभिनेत्री नुतन यांची आज ८३ वी जयंती आहे. ४ जून, १९३६मध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी मिस इंडियाचा किताब पटकावला होता.
दिवंगत अभिनेत्री नूतन यांनी १९४५ साली आपल्या करियरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यांनी त्यांचे वडील कुमार सेन यांच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
१९५० साली हमारी बेटी चित्रपटात त्या झळकल्या होत्या. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी अॅडल्ट सिनेमात काम केले होते.
नूतन यांच्या नगीना चित्रपटाला सेंन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिले होते. हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा होता. नुतना १४ वर्षांच्या होत्या म्हणून त्यांना हा सिनेमा पाहता आला नाही. त्यांना सुरक्षा रक्षकांनी थिएटरमध्ये जाऊ दिले नव्हते.
१९५८ साली दिल्ली का ठग या चित्रपटात स्वीमसूट परिधान करून त्यांनी सर्वांना थक्क केले होते. या व्यतिरिक्त बारिशमध्ये तिने काही बोल्ड सीने दिले होते. त्यावेळी विरोधदेखील झाला होता. नुतन यांचे म्हणणे होते की, कलाकाराला स्क्रीप्टनुसार या सर्व गोष्टींचा विचार केला नाही पाहिजे.
नूतन यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगायचे तर नूतन यांनी १९५९ साली रजनीश बहल यांच्यासोबत लग्न केले होते. रजनीश हे नेवीमध्ये लेफ्टिनंट कमांडर होते.
नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तर त्यांची नात प्रनुतन बहल हिने नुकतेच नोटबुक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
नुतन यांचे २१ फेब्रुवारी, १९९१ साली निधन झाले. त्या बऱ्याच कालावधीपासून कॅन्सरशी सामना करत होत्या. त्यांचा कॅन्सर बरा झाला होता. पण पुन्हा त्यांच्या लीवरमध्ये कॅन्सरचे निदान झाले होेते.
नूतन या अभिनेत्री काजोलची मावशी आहे. नूतन यांची आई शोभना समर्थ त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होत्या.